शूरवीर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे अनेक किस्से आपण ऐकत असतो. पोलिस दिवस-रात्र, ऊन-पाऊस न पाहता आपलं काम चोख बजावत असतात. त्यांची ड्युटी म्हणजे २४ तासच असते, असं म्हणायला काही हरकत नाही.

सोशल मीडियावर पोलिसांच्या अशा कारवाईचे अनेक व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात. परंतु, आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला नेमकं घडलंय काय हेच कळत नाहीय. या व्हिडीओमध्ये एक पोलीस भररस्त्यात धडपडताना दिसतोय. त्याने व्यसन केलंय असं अनेकांचं म्हणण आहे. नेमकं काय घडलंय जाणून घेऊ या…

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये एक पोलिस अधिकारी रस्त्यावर धडपडताना दिसतोय. या पोलिस अधिकाऱ्याला कसलीच शुद्ध नसल्याचं दिसून येतेय. त्याच्या एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात फोन असल्याचंही दिसून येतंय. धडपडत असताना त्याच्या हातून रायफल आणि फोन निसटतो. पोलिस अधिकाऱ्याला अशा अवस्थेत पाहून तिथले काहीजण पोलिस अधिकाऱ्याला मदतीचा हात देतात. त्याला उचलून दोघेजण रस्त्याच्या कडेला घेऊन जातात, असंही व्हिडीओमध्ये दिसतंय. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @indians या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “बिजनौर रस्त्यावर दारू पिऊन पोलिस अधिकारी रायफल घेऊन धडपडताना दिसला” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.२ व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “जेव्हा तुमची निवड गुणवत्तेऐवजी पैशाच्या आणि राजकारणाच्या आधारे एखाद्या पदासाठी होते तेव्हा असेच घडते.” तर दुसऱ्याने “कदाचित तो टेंशनमध्ये असेल म्हणून त्याने अशं केलं असेल” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “प्रत्यक्षात काय घडले हे न कळता लोक वाईट विचार का करतात, वास्तविकता सिद्ध होईपर्यंत न्याय करू नका.” तर एकाने “दारुचा नाद लय बेक्कार”” अशी कमेंट केली.