Drunk woman Hits Cab Driver: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात अनेकदा भांडणाचे, मारामारीचे व्हिडीओ असतात, जे पाहून धक्काच बसतो. अनेकदा यात चूक नसतानाही एखाद्याला ऐकून घ्याव लागतं. सध्या अशीच घटना दुबईमध्ये घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

महिलेची दादागिरी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मद्यधुंद अवस्थेत दिसणारी महिला कॅब ड्रायव्हरवर ओरडताना दिसली. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, महिलेने असा दावा केला आहे की, चालकाने तिला तिच्या पत्त्यावर न सोडता चुकीच्या ठिकाणी आणून सोडले आहे. यावर चालक वारंवार हेच सांगत होता की, तिने रजिस्टर केलेल्या लोकेशनवरच त्याने सोडलं आहे. तरीही नशेमध्ये असलेल्या महिलेने त्याचं न ऐकताच त्याला मारहाण केली. त्याच्याशी वाद घालत बसली. इतकंच नाही तर तिने तिच्या मोबाइल फोननेदेखील त्याच्या डोक्यावर हल्ला केला.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
One mistake and the game is over Young man's unnecessary stunt in the swimming pool viral video will make you shiver
“एक चूक अन् खेळ खल्लास!” स्विमिंग पुलमध्ये तरुणाची नको ती स्टंटबाजी, Viral Video पाहून अंगावर येईल काटा
pune viral video man break all traffic rules
पुणे पोलीस आहात कुठे? भररस्त्यात जोडप्याने अक्षरश: मर्यादा ओलांडली? VIDEO पाहून संतापले लोक
Viral video of a young girl dancing on a bench and fell down for a reel on social media
रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; वर्गात बेंचवर चढली अन् तरुणीबरोबर असं काही झालं की…, पाहा VIDEO
video of school students hugging each other in classroom went viral on social Media obscene video viral
भरवर्गात त्यानं तिला…, शाळेत विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही तर हद्दच…”

हेही वाचा… भावाने बहिणीची ‘ती’ इच्छा केली पूर्ण! दादाने दिलेलं गिफ्ट पाहून ती मिठी मारून रडायलाच लागली, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

यादरम्यान, चालक तिला मारहाण न करण्यासाठी सांगत होता “Don’t touch me (मला हात लावू नका, मॅडम)”, असं तो वारंवार म्हणत होता. कॅमेऱ्यात ही घटना रेकॉर्ड करत असताना त्याने महिला प्रवाशाला स्पष्ट केले की, तिने ज्या लोकेशनसाठी कॅब बुक केली होती तिथेच त्याने आणले होते, परंतु महिलेने दावा केला की त्याने तिला चुकीच्या ठिकाणी नेले. तसंच महिला त्याला असंही म्हणाली की, “एवढी किंमत का दाखवत आहे, माझ्या ठिकाणी मला घेऊन जा.” व्हिडीओच्या शेवटी चालक सहजपणे बाहेर पडला, पण पुढे काय झाले ते अजूनही अस्पष्ट आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

महिला आणि कॅब ड्रायव्हरच्या वादाचा हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा… “तू माझी आई गं…”, सासरी जाणाऱ्या मुलीला रडू झालं अनावर, काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच

एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अशा महिलांना थोबाडीत मारली पाहिजे, एका निष्पाप चालकाला अशा प्रकारे मारहाण करतात का? दुबईत कायदा नाही का? या महिलेला शिक्षा झाली पाहिजे, मद्यपान करून कोणाशीही गैरवर्तन करता येणार नाही.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “मला आशा आहे की ते तिला तुरुंगात टाकतील. दुबईचे कायदे कठोर आहेत आणि भारतीय कायद्यांप्रमाणे महिलांना वेठीस धरू नका.” तर एकाने “हा व्हिडीओ व्हायरल झाला पाहिजे” अशी कमेंट केली.

Story img Loader