Father and Son Shocking Video: वाईट वेळ कधी येईल हे काही सांगता येत नाही. आजकाल कोणत्या ना कोणत्या कारणाने जागोजागी होणाऱ्या अपघातांच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. या अपघातात अनेकदा चालकांना गंभीर दुखापत होते तर काही जण आपला जीवच गमावून बसतात. अशावेळेस सावधगिरी बाळगून वेळीच योग्य ते पाऊल उचलल्याने संकट टळू शकतं.

गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील होत असतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका स्कूटरचालकाबरोबर आणि त्याच्या लहान मुलाबरोबर घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका स्कूटरला अचानक आग लागली. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ या…

स्कूटरने पेट घेतला अन्…

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की रस्त्याच्या कडेला एका स्कूटरवर एक लहान मुलगा आणि त्याचे वडिल बसले आहेत. तेवढ्यात स्कूटर अचानक पेट घेते आणि लगेच आगीचा भडका उडतो. आग लागताच लहान मुलगा स्कूटरवरून पळ काढतो तसंच त्याचे वडिलही स्कूटरवरून लांब पळतात. मुलगा पळत असताना त्याच्या पायालादेखील आग लागल्याचं दिसून येतंय. या अपघातात पुढे बसलेल्या लहान मुलाला दुखापत झाल्याचं वृत्त आहे. यादरम्यान, ही घटना केरळच्या पालक्कडमध्ये घडल्याचं बोललं जातंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @boldmediaindia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला “वडिल आणि मुलगा स्कूटीवर असताना झाला स्फोट” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला २० लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “या इलेक्ट्रिक स्कूटर बेकारच असतात. कितीही मोठ्या कंपनीची स्कूटर खरेदी केली तरी असंच बघायला मिळतं” तर दुसऱ्याने “हा फक्त गाडी बघतोय त्या मुलाला बघायचं सोडून” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “असा बाप कुठे असतो का? त्याच्या बापाला हेल्मेटची जास्त काळजी वाटत होती असं वाटतंय. त्याच्या मुलाची पॅंट जळत होतो ती आधी विजवायची सोडून हा हेल्मेट काढत बसला होता” अशी कमेंट केली.