Shocking Video, Delhi journalist harassed: सोमवारी (१७ फेब्रुवारी) रात्री १०:३० वाजताच्या सुमारास लाजपत नगरहून संत नगरला घरी परतताना झालेल्या छळाचा त्रासदायक अनुभव सूर्यांशी पांडे नावाच्या एका महिला पत्रकाराने अलीकडेच इंस्टाग्रामवर शेअर केला. तिच्या हृदयस्पर्शी पोस्टमध्ये, तिने काही गंभीर घडले नाही याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली परंतु राष्ट्रीय राजधानीत महिलांना वारंवार होणाऱ्या छळाविरुद्ध बोलण्यास भाग पाडले गेले. याप्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
तरुणीचा व्हिडीओ व्हायरल
तिच्या पोस्टमध्ये, तिने एका कारमधील तरुणांच्या ग्रुपने तिच्याशी कसे अनुचित वर्तन केले, ज्यामुळे तिला असुरक्षित वाटले, हे सांगितले. व्हिडीओमध्ये ती म्हणाली, “दिल्लीमध्ये कोणीच सुरक्षित नाही आहे, मी आता इथे. मी माझ्या घराच्या जवळ लाजपतनगर इथे आहे आणि मला माझ्या घरी संतनगर इथे जायचआहे. मला तुम्हाला माझा अनुभव शेअर करायाचाय. तुम्ही पाहू शकता की मी संपूर्ण व्यवस्थित कपडे घातले आहेत. हे कपडे कुठूनही रिव्हिलिंग नाही आहेत. मी घरी जात होती आणि एक गाडी आली ज्यात खूप विचित्र मुलं बसलेली होती. आणि मी त्यांच्यापासून खूप लांब होती. आणि तिथूनच ते ओरडून मला बोलले “ओय इधर आ” (ओय, इकडे ये.) “
“ही आहे दिल्ली आणि ही इतकी असुरक्षित आहे की, तुम्ही फक्त आपल्याच वाटेने घरी जाताय, तरी तुम्हाला त्रास दिला जातो.” पुढे ती असंही म्हणाली.
तसंच “इथून बाइकवरून एक मुलगा जातोय, एकदम वल्गर गाणं म्हणत माझ्याकडे बघतोय, त्याला काय दिसतंय काय नक्की, हेच कळत नाही” त्याचवेळी दुसरा आलेला वाईट अनुभवही तिने या व्हिडीओमध्ये शेअर केलाय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला तरुणीचा हा व्हिडीओ @suryanshi_pandey या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल २४.६ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आपल्या सरकारने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आजकाल फक्त दिल्लीच नाही, तर प्रत्येक शहराची अशीच अवस्था आहे.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “दिल्ली आणि गुरुग्राममध्ये मी बॅगी कपडे घालून योगा क्लासमधून बाहेर पडले होते तेव्हा मला हे अनेक वेळा अनुभवायला मिळाले. आणि हे सगळं सांगताना आपल्याला आपल्या कपड्यांचं वर्णन करायला लागतंय याची खेद वाटते.” तर एकाने “म्हणूनच मला दिल्ली आवडत नाही, मी स्वत: अशा अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत.” अशी कमेंट केली.