सोशल मीडियावर अनेकदा व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात अपघातांच्या व्हिडीओंचं प्रमाणही जास्त असतं. अशा अपघातांत माणसं गंभीर जखमी तरी होतात किंवा त्यांना मृत्यूला तरी सामोरं जावं लागतं.

अनावधानाने घडलेली एक चूक माणसाचं आयुष्य धोक्यात टाकू शकते. अशात कोणाची वाईट वेळ कधी सांगून येत नाही. अचानक दुर्घटना कधी घडेल आणि कोणाचं नशीब कसं त्याच्यावरच उलटेल हे काही सांगता यायचं नाही. सध्या अशीच दुर्घटना एका तरुणीबरोबर घडली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या घटनेत एक तरुणी थेट आकाशपाळण्यावरूनच खाली पडली. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…

तरुणीचा अपघात

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक मेळा भरलेला आहे. या मेळ्यात एका तरुणीबरोबर ही दुर्घटना घडली आहे. ती आकाशपाळण्यातून पडून अपघात झाल्याचं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. व्हिडीओमध्ये ती तरुणी रक्तानं माखलेली दिसतेय. तिच्याबरोबर एक तरुणदेखील आहे, जो तिला पकडून बाहेरच्या दिशेनं नेतोय. हा अपघात साधासुधा नसून खूप मोठा होता आणि व्हिडीओत तिच्या तोंडाला खूप लागल्याचं दिसतंय. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे आणि कधी घडली हे अद्याप कळू शकलेलं नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @rs.desi_chori या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्याला ‘आकाशपाळण्यातून पडून जखमी झाली’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल १.४ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “अरे, जरा तरी लाज बाळगा, तिला एवढं लागलंय आणि तुम्ही व्हिडीओ काढताय?” दुसऱ्यानं, “या संदर्भात तक्रार दाखल करायला हवी”, असं म्हटलंय. तर एकानं, “खूप वाईट झालं त्या मुलीबरोबर”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “हेच जर दुसऱ्या देशात झालं असतं, तर त्यावर कारवाई झाली असती”.

Story img Loader