Shocking video: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत. अन्न खाताना, व्यायामशाळेत व्यायाम करताना किंवा नाचत असतानाही लोकांचा अचानक मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. यामध्ये आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. हल्ली हार्ट अटॅक किंवा स्टॉक्सचे प्रमाण लोकांमध्ये वाढले आहेत. काही काळापूर्वी अटॅक फक्त वृद्ध लोकांना येत होते. परंतू आता तरुण आणि अगदी लहान मुलांना देखील हे येत आहे. यासंबंध काही व्हिडीओ ही सोशल मीडियावर समोर आले आहे. जे तुम्ही पाहिले ही असतील. हे व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवणारे असतात.असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक तरुणी स्टेजवर डान्स करता करता खाली कोसळली.
नेमकं काय घडलं?
अचानक एका तरुणीचा डान्स करताना जीव गेल्याचा प्रकार घडला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डान्स करता करताना ही तरुणी खाली कोसळली ती परत उठलीच नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी डान्स करत आहे आणि समोर बरेच लोक बसले आहेत, यावेळी सगळे या तरुणीच्या डान्सला प्रतिसाद देत आहेत, कुणी टाळ्या वाजवत आहे कुणी शिट्या वाजवत आहे तर कुणी व्हिडीओ काढत आहे, मात्र अचानक डान्स परफॉर्मन्स सुरू असतानाच तरुणी खाली कोसळते. यावेळी सगळेच घाबरतात आणि तरुणीच्या दिशेनं धाव घेतात. हा व्हिडीओ जुना असून पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
संपूर्ण देशात हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तरुण आणि लहान मुलांनाही अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होत आहे. मोबाईलवर गेम खेळत असताना, खेळताना, धावत असताना, नाचताना आणि अगदी निष्क्रिय बसल्यानेही अनेक मुलांना हृदयविकाराचा झटका येतो.
तरुणांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. व्हिडिओंमध्ये तरुणांना त्यांच्या कार्यालयात काम करताना, जिममध्ये व्यायाम करताना आणि खेळ खेळताना हृदयविकाराचा झटका येत असल्याचे दिसते.