Shocking Video of Girl: मुलींचा आदर करायला शिका, असे संस्कार लहानपणापासूनच अनेकांना दिले जातात. माणूस पैशांनी नाही, तर मनाने श्रीमंत असला पाहिजे, असं म्हणतात. वाईट वेळेत जो माणूस मदतीला धावून येईल, तोच खरा माणूस. कधी कधी अशा वाईट प्रसंगांत आपल्या जवळ असणारी आपले लोक आपल्याला मदत करत नाहीत; पण अनोळखी लोक माणुसकी दाखवतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात एका तरुणीचा स्कर्ट फाटला आणि तिच्याबरोबर असलेला तिचा मित्र तिला पाहून हसायला लागला… पण पुढे जे झालं, ते पाहून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल.

हेही वाचा… एवढा पैसा कुठे घेऊन जाणार? जमिनीच्या वादावरून वयोवृद्धावर काठीने केला हल्ला, वाचवायला तरुणी मध्ये आली पण…, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

u

तरुणीचा स्कर्ट फाटला अन्…

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेवरून एक तरुण व तरुणी गप्पा मारत चालत आले आणि तिथे असलेल्या एका बेंचवर बसले. तिथे आजूबाजूलाही काही माणसं उभी होती. बेंचवरून उठल्यानंतर अचानक तरुणीला कळतं की तिचा स्कर्ट मागून फाटला आहे. हे लक्षात येताच तरुणी घाबरते आणि तिच्याबरोबर असलेला तरुण तिची मदत करायची सोडून तिला पाहून हसायला लागतो. पण, तिथे असलेला एक माणूस तिच्या मदतीला धावून येतो. कशाचाही विचार न करता, तो तरुणीचं संरक्षण करतो. तो स्वत:ची लुंगी त्या रस्त्यावर काढून, तरुणीला देतो आणि तिला कमरेला ती लुंगी बांधण्याचा आग्रह करतो. अशा प्रकारे तो तिला या संकटातून वाचवतो.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/the.laugh.villa/reel/C_zwuShPa-W/

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @the.laugh.villa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला तब्बल ३.६ दशलक्ष व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेलं नाही.

हेही वाचा… ‘तो’ दोन तास शेजारी उभा होता; पण महिलेने रिकाम्या सीटवरून काढला नाही पाय, ट्रेनमधील ‘हा’ VIDEO पाहून सांगा चूक कोणाची?

युजर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “माणुसकी अजूनही जिवंत आहे.” तर दुसऱ्यानं “तो माणूस गरीब असला तरी मनानं खूप श्रीमंत आहे”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “या माणसानं तर मन जिंकलं. आम्हाला तुझा अभिमान आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of girls skirt was torn on road unknown person helped her while her friend laughed dvr