Groom Bride Video: लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. लग्न प्रत्येकासाठीच खूप खास असतं. आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते. लग्नसोहळ्यातील काही विशेष क्षण अनेकांच्या लक्षात राहतात.

त्यात आजकाल लग्नात खास डान्स परफॉर्मन्स करणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे. आपल्या जोडीदारासाठी या खास दिवशी डान्स करीत वधू-वर आपला आनंद द्विगुणीत करतात. सोशल मीडियावर अनेकदा लग्नसोहळ्यातील अशा डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या नवरीचा असाच एक डान्स परफॉर्मन्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय; पण या परफॉर्मन्समुळे नवऱ्याला राग आला आहे. नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊ…

नववधूचा डान्स व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक लग्नसोहळा पार पडतोय. वर आणि वधू स्टेजवर उभे असताना अचानक वधू डान्स करू लागते. आपल्या लग्नाचा आनंद साजरा करीत ती स्टेजवरच डान्स करीत व्यक्त होते. पण, हे काही नवरदेवाला पटलेलं दिसत नाही. ती डान्स करताना नवरदेव तिच्याकडे रागानं बघतो. तो खाली मान घालूनच स्टेजवर वावरत असतो. इतक्यात नवरीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि ती डान्स करणं थांबवते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @memes.bks या इन्स्टाग्राम अकांउटवरून शेअर करण्यात आला असून, ‘सावधान, वधूला स्टेजवर नाचताना पाहून वराला राग आला’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ७.६ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “तिला नाचू द्या, ती तिच्या लग्नाचा आनंद घेत आहे.” दुसऱ्यानं “अशा मुलाशी लग्न होण्यापेक्षा नाही झालेलंच बरं”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “ती किती आनंदी होती, काही सेकंदांतच तिच्या चेहऱ्यावरचं हसू घालवलं यानं.”

Story img Loader