Shocking Video Viral: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. वाईट वेळ कधी सांगून येत नाही, म्हणून नेहमी जबाबदारीने वागणं गरजेचं असतं. कोणती चूक कधी अंगाशी येईल आणि दुर्घटना घडेल हे काही सांगता येत नाही. आणि अशा दुर्घटनेत नशिबाने कोण वाचलं तर ठिक नाहीतर अनेकदा दुखापत होते किंवा काहींच्या जीवावरही बेततं. अशा घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सध्या अशीच घटना एका ठिकाणी घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, या व्हिडीओमध्ये एका घराला आग लागली आहे. नेमकी कशामुळे आग लागली आणि नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊ या…
…अन् आगीचा भडका उडला
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमच्या पायाखालची जमिनच सरकेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका घरात रात्रभर फोन चार्जिंगला लावल्याने अचानक स्पार्क होतो आणि स्विचला आग लागते. स्विचला आग लागताच एक मोठा भडका उडतो आणि घरात सगळीकडे आग पसरते. घऱातील सोफा, टीव्ही सगळीकडे आगीचे लोट पसरतात. यादरम्यान, ही धक्कादायक घटना नेमकी कुठे घडली, हे अद्याप कळू शकलं नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @sarpmitra_pravinpatil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला “मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावून ठेवू नका, आग लागू शकते” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ४.६ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “पुन्हा कधी असा फोन ठेवत जाऊ नका” तर दुसऱ्याने “व्हिडीओ बनवण्यापेक्षा ती आग विझवून टाक” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “हा व्हि़डीओ एडिट केलेला वाटतो आहे, खोटा आहे हा व्हिडीओ” अशी कमेंट केली.