Kettle caught fire: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपल्याला थक्कच करणारे असतात, जे आपल्या कायमचे लक्षात राहतात. या डिजिटल युगात व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

घरात अनेक इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर होतो आणि हल्ली लहानसहान गोष्टींसाठी नवनवीन इलेक्ट्रिक उपकरणं आली आहेत. तसंच आता पाणी गरम करण्यासाठी इलेक्ट्रिक केटलचा घराघरात वापर केला जातो. अनेकदा बाहेर कुठे गेल्यावरही याचा चांगल्या प्रकारे वापर करता येतो आणि हे केटल उपयोगीही पडते. पण, प्रत्येक गोष्टीचा वापर करताना काळजी घेणं गरजेचं असतं; नाही तर दुर्घटना घडू शकते.

सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलेल्या केटलने अचानक पेट घेतला. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या..

पाणी गरम करताना केटलने घेतला पेट

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात पाणी गरम करायची केटल दिसतेय. ही केटल आजकाल अनेकांच्या घरी असते. सहज कुठेही यात आपण पाणी गरम करू शकतो. पण याचाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात पाणी गरम करायला ठेवलेल्या केटलला अचानक आग लागली आणि त्यातून धूर निघू लागला.

इन्स्टाग्रामवरील @kusumlata10121992 या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तर या व्हिडीओला “आजकाल सगळ्यांच्या घरी पाणी गरम करायची केटल असते, तर कृपया सावधान राहून पाणी गरम करा.” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २२ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “व्हिडीओ बनविण्यासाठी मुद्दाम आग लावण्यात आली आहे.” तर दुसऱ्याने “चायनीज किंवा लोकल प्रॉडक्ट वापराल, तर असंच होईल” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “काल माझ्या घरीपण असंच झालं होतं, नशीब वाचलो.