Kid mobile addiction video: मुलांना जन्म दिल्यानंतर पालकांवर एक मोठी जबाबदारी असते ती म्हणजे त्यांना योग्य ती शिस्त, संस्कार आणि चांगली सवय लावण्याची. आजकाल अनेक लहान मुलं मोबाइलच्या आहारी गेले आहेत. मोबाइलशिवाय ते सुखाचा जेवणाचा घासही घेत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सगळ्या गोष्टींसाठी त्यांना मोबाइल हवा असतो. पण, याच चिमुकल्यांना मोबाइलची सवय कळत नकळत पालकांकडूनच लागते, असं म्हणतात. या एका सवयीमुळे मुलांचं आयुष्य खराब होऊ शकतं. मोबाइलचं व्यसन लागल्यामुळे मुलांना आजूबाजूला नेमकं काय घडतंय हेदेखील कळत नाही. याच व्यसनामुळे मुलं चुकीच्या मार्गालादेखील लागतात. सध्या असाच एक भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक मुलगा झोपेतच बडबडतोय. नेमकं काय घडलंय या मुलाबरोबर, हे जाणून घेऊ या…

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा झोपेत काहीतरी बडबडताना दिसत आहे. तर त्याची ही अवस्था पाहून आजूबाजूला अनेकजण जमले आहेत. काहीजण त्याचा हात चोळून पाहतायत तर काहीजण त्याच्या डोक्यावरून हात फिरवतायत. पण झोपेत हा मुलगा काही केल्या बोलायचं बंदच करत नाहीय. बोलत असताना तो आपले हातपायदेखील हलवताना दिसत आहे. कधी कोणत्या चित्रपटातला डायलॉग तर कधी कोणतं गाणं बडबडताना तो या व्हिडीओमध्ये दिसतोय.

लहान मुलाचा हा व्हिडीओ @anil_karandekar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला “आपल्या लेकरांना मोबाइलपासून दूरच ठेवा, याला मोबाइलची सवय झाली होती पाहा” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ४.२ मिलियन व्हयुज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “लहान लेकरांना मोबाइल देऊ नका सावधान व्हा” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “पहिल्यांदा पालकांनी मोबाइल फोन कमी वापरा आणि फावल्या वेळात मुलांना वेळ द्यावा म्हणजे ही वेळ नाही येणार…” तर एकाने “खूप भयानक परिस्थिती आहे, मुलं अजिबात ऐकत नाहीत. मायबाप आपली प्रॉपर्टी आपले मुलं आहेत त्यांना सांभाळा वेळ निघून गेली काही ऊरणार नाही” अशी कमेंट केली.