Viral Video : सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. हा मेळा १३ जानेवारीपासून सुरू झाला असून २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यंदाच्या महा कुंभमेळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. हा महाकुंभ १४४ वर्षांनंतर होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति कुंभ राशीत प्रवेश करतो तेव्हा कुंभमेळा भरतो. पौराणिक कथेनुसार, याचा संबंध समुद्रमंथनाशी देखील जोडला आहे. कुंभमेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केल्याने आशीर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक जण त्रिवेणी संगमात स्नान करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच त्रिवेणी संगमचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की त्रिवेणी संगमात चपलांचा ढीग आढळला आहे आणि काही स्वच्छता कर्मचारी हा ढिग उचलताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही संताप येईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Shocking video of Kumbh Mela A pile of shoes in the holy triveni sangam Ganges Yamuna and Saraswati rivers in Prayagraj)

प्रयागराजमधील त्रिवेणी संगम हा कुंभमेळ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम असलेला त्रिवेणी संगमात स्नान करण्यास लाखो भाविक महाकुंभ मेळ्यात गर्दी करत आहे. पण याच त्रिवेणी संगमातला हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की त्रिवेणी संगमात चपलांचा ढीग जमा झालेला दिसत आहे आणि स्वच्छता कर्मचारी हा ढीग उचलताना दिसत आहे. हा चपलांचा ढीग पाहून कोणालाही संताप येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “कुंभमेळ्यात कोणा कोणाची चप्पल हरवली आहे?”

पाहा व्हायरल व्हिडीओ

Bunny Verma या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नदीला देवी मानणारे असे कसं करू शकतात, देवा यांना सद्बुद्धी दे” तर एका युजरने लिहिलेय, “गंगेत स्नान करण्यापेक्षा गंगा स्वच्छ करा.. पुण्य लाभेल.” आणखी एका युजरने लिहिलेय, “गंगेची दुर्दशा केली आहे” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे तर काहींनी दु:ख व्यक्त केले आहे.