Shocking video: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल, तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी; अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात; तर काही व्हिडीओ मजेदार असतात. त्यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून सिंहाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी देखील सिंहाला घाबरतात. तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिंहाने म्हशीचा कळपावर हल्ला केला आहे.जंगलात एक सिंह शिकारीच्या शोधात भटकंती करताना दिसत आहे. शिकारीच्या शोधात तो म्हशींच्या एका कळपाजवळ येतो आणि आश्चर्यकारक घटना घडल्याचं या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळतं.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंह आणि म्हशींच्या झुंजीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओत एक सिंह शिकारीच्या शोधात म्हशींच्या कळपाजवळ पोहोचतो. आपल्याला सहजासहजी शिकार मिळाली असा विचार करत तो म्हशींवर हल्ला करतो. सिंह एखाद्या म्हशीला शिकारीसाठी लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतो आणि पुढच्याच क्षणी कळपातील एका म्हशीला पकडतो आणि शिकार करतो. यावेळी दोघेही ताकद लावत आहेत, एक शिकार करण्यासाठी तर एक शिकारीच्या तावडीतून निसटण्यासाठी. सिंहानं मात्र शेवटपर्यंत म्हशीला आपल्या जबड्यातून सोडलं नाहीये.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील kris_the_ai_marketer या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. . एका युजरने म्हंटलंय की, “सिंहाच्या जिद्दीला सलाम”, तर दुसरा युजर म्हणतो, “शिकार करो या शिकार बनो”