Viral video : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला हसवणारे असतात तर काही थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडिओत महिलेच्या कानातून जे काही बाहेर निघते, ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.

नेमकं प्रकरण काय?

एक महिला झोपली असताना, तिच्या कानात अचानक एक कोळी शिरला होता. कोळी शिरल्यानंतर या महिलेच्या कानात दुखायला सुरुवात झाली. कान दुखतोय म्हणून या महिलेने कानात हात टाकून स्वतः तपासले. मात्र तिला काहीही सापडले नाही. यासोबतच तिच्या कुटुंबीयांनी देखील कानात टॉर्च मारून कान तपासला मात्र त्यांनाही कानात काही दिसले नाही.

video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Heartbreaking incident betrayed in love young boy jumps into water in jagdalpur chhattisgarh video
“त्या आईचा तरी विचार करायचा रे” गर्लफ्रेंडने फसवल्याने तरुणाचा टोकाचा निर्णय; VIDEO पाहून धक्का बसेल
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
netizen troll to marathi singer juilee joglekar for her kandepohe performance
Video: “वेगळं काय तरी करा…”; जुईली जोगळेकरच्या ‘त्या’ परफॉर्मन्सवर नेटकऱ्याची खोचक प्रतिक्रिया, गायिका म्हणाली…
Zeenat Aman shares her pill swallowing horror story
“औषध घेताना गोळी घशात अडकली अन् माझा श्वास…..”; झीनत अमानने सांगितला भयावह किस्सा; तुमच्याबरोबर असे घडले, तर काय करावे?
Little boy crying a school telling teacher about fathers abuse and asking not to beat video viral on social media
“मग माझ्या बापालाच फोन करा की…”, ढसाढसा रडत शाळेतील मुलाची शिक्षिकेकडे विनवणी; VIDEO मध्ये पाहा चिमुकल्याचं नेमकं म्हणणं काय?

महिला डॉक्टरांकडे गेली

या महिलेला कानात दुखायचा त्रास दिवसेंदिवस वाढू लागल्यावर या महिलेने डॉक्टरांकडे धाव घेतली. या महिलेचा पती तिला बेंगळुरूच्या कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथल्या डॉक्टरांनी या महिलेच्या कानाची स्पेशल कॅमेऱ्याने तपासणी केली. तपासणी करतेवेळी डॉक्टरांनी जे कानात पाहिले ते पाहून त्यांना देखील धक्का बसला होता.

( हे ही वाचा: भुकेलेल्या हिप्पोने २ वर्षाच्या बाळाला गिळलं; पण नंतर असं काही घडलं की त्याला पुन्हा जिवंत बाहेर फेकलं)

कानात नेमकं होतं तरी काय?

जेव्हा डॉक्टरांनी स्पेशल कॅमेऱ्याने महिलेच्या कानाची तपासणी केली. त्यावेळी डॉक्टरांना जे दिसलं ते धक्कादायक होत. त्यांना या महिलेच्या कानात एक छोटा कोळी वावरताना दिसला. जो या महिलेच्या कानात स्वतःचे घर बनवत होता. हा कोळी असल्याने या महिलेच्या कानात वेदना होत होत्या. दरम्यान नंतर डॉक्टरांनी मोठ्या कष्टाने या कोळीला कानातून बाहेर काढले. त्यानंतर महिलेचा कान दुखायचा बंद झाला. दरम्यान महिलेच्या कानातुन कोळी बाहेर येत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे जो प्रचंड व्हायरल होतोय.

येथे पहा कोळी कानात वावरत असल्याचा व्हिडीओ

हा व्हिडिओ लाड बायबल या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट कऱण्यात आला असून या व्हिडिओला १ लाखाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच अनेकजणांनी यावर कंमेंट देखील केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

Story img Loader