वर्षानुवर्षं मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडिया, वृत्तपत्रं, बातम्या यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या उघडपणे फिरतात. भररस्त्यात सगळ्यांसमोर महिलांची छेड काढतात, त्यांच्यावर हल्ला करतात. आणि या सगळ्यात ते काही चुकीचं करतायत असं त्यांना वाटतही नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा परिस्थितीत काही मुली आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात, तर काही जणी तसाच अत्याचार सहन करत घाबरून शांत बसतात. सध्या अशीच भयंकर घटना एका महिलेबरोबर घडलीय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये भररस्त्यात एक पुरूष महिलेला मारहाण करताना दिसतोय. नेमकं काय घडलं, जाणून घ्या…

भररस्त्यात महिलेवर अत्याचार

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक माणूस एका महिलेला फरफटत आणताना दिसतोय. तसंच तिला खेचत आणत तो एका रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलमध्ये शिरतो आणि तिला तिथेच जमिनीवर ढकलतो व मारहाण करू लागतो. हे पाहून तिथे काही माणसं जमा होतात आणि महिलेला त्या विकृत माणसापासून वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण हे सगळं करत असताना त्या विकृत माणसाच्या चेहऱ्यावर एकदाही अपराधाची भावना दिसत नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @success_life_line___01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “कोणासोबत असं करू नका” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला २ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “स्त्री वर हात उचलणाऱ्या या नराधमाला मारलं पाहिजे” तर दुसऱ्याने “अरे तू माणूस की हैवान? ” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “एवढं सगळं होऊनदेखील कोणीच त्या माणसावर एक हातदेखील नाही उचलला”