Shocking Video: मृत्यू कधी सांगून येत नाही, असं म्हणतात. अगदी ठणठणीत असलेला माणूसदेखील अचानक आपला जीव गमावतो. कधी कोणता दिवस शेवटचा ठरेल हे आजकाल सांगता येत नाही.
सध्या असाच काहीसा प्रकार एका माणसाबरोबर घडलाय, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, या व्हिडीओमध्ये त्या माणसाची काहीच चूक नसताना त्याच्याबरोबर भयंकर अपघात घडला, नेमकं असं घडलं तरी काय, जाणून घेऊ या…
वाईट वेळ कधी सांगून येत नाही
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका ठिकाणी खूप साऱ्या गोण्या एकावर एक अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत. या गोण्यांमध्ये काहीतरी जड सामान असल्याचं कळून येतंय. व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, याच गोण्यांच्या बाजूने एक माणूस जात असतो आणि तितक्यात गोण्यांचा तोल जातो. गोण्यांचा अचानक तोल गेल्याने त्या माणसावर कोसळतात. तो माणूस गोण्यांखाली चिरडून जमिनीवर आदळतो. या अपघातामुळे आजूबजूला सगळी माणसं जमा होतात आणि त्याची मदत करू पाहतात. पण अचानक इतक वजन अंगावर पडल्याने त्याच्या डोक्यामधून रक्तस्त्राव होण्यास सुरू होतो.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @therimonmir या इन्स्टाग्राम अकांउटवरून शेअर करण्यात आला असून सावधान, “एखाद्याचा मृत्यू कधी आणि कसा होईल हे सांगता येत नाही.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला ३० लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय, हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खूप वाईट झालं त्या माणसाबरोबर”, तर दुसऱ्याने “अरे बापरे, असं कोणाबरोबरच घडू नये…” अशी कमेंट केली; तर “जर लोकांना माहित पडले असते की त्यांचा मृत्यू कसा होणार आहे तर ते त्याबद्दल अधिक काळजी घेतील. देवालाच आपल्या मृत्यूची वेळ माहित आहे.” अशी एकाने कमेंट केली. तर एकाने “वाईट वेळ कधी सांगून येत नाही” अशी कमेंट केली.