Shocking Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर; तर काही व्हिडीओ आपल्याला थक्क करणारे असतात, जे आपल्या कायम लक्षात राहतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा आवड म्हणून किंवा मजेसाठी लोक लहानसहान स्पर्धेमध्ये सहभाग घेतात आणि जर त्यात ते जिंकले, तर त्यांना बक्षीस म्हणून प्रशस्तिपत्रासह चांगली रक्कम मिळते. पण, काही खेळ, स्पर्धा या धोकादायक असतात आणि अशा स्पर्धांमधील त्या त्या खेळात आपण जोपर्यंत प्रावीण्य मिळवत नाही तोपर्यंत त्यात सहभाग घेऊ नये; अन्यथा मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागतं.

काही खेळांमध्ये स्पर्धकाच्या किंवा समोरच्याच्या चुकीमुळे तुम्हाला आयुष्याची किंमत मोजण्याची वेळ येऊ शकते. सध्या अशीच काहीशी घटना एका ठिकाणी घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका स्पर्धेदरम्यान एका माणसाचा हातच मोडतो. या घटनेत नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊ…

हेही वाचा… रेल्वेस्थानकावर कपलचे अश्लील चाळे, प्लॅटफॉर्मवर केलं असं काही की…, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा VIDEO व्हायरल

…अन् स्पर्धा ठरली जीवघेणी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक धक्कादायक क्षण कैद झाला आहे आणि त्यामध्ये दोन तरुणांमधील आर्म रेसलिंग (पंजा लढवणे) स्पर्धेला दु:खद वळण मिळाल्याचे पाहायला मिळाले. सामन्यादरम्यान एका स्पर्धकाचा हात मोडतो, ज्यामुळे दर्शक हेलावतात.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधल्या माझोला येथील मियां कॉलनी भागात गेल्या रविवारी ही घटना घडली. ₹ १०,००० ची सट्टेबाजी होणाऱ्या या खेळाच्या स्पर्धेदरम्यान काशिफ या स्पर्धकाचा हात मोडला. हे क्षेत्र शक्तीच्या अशा प्रदर्शनांसाठी ओळखले जाते, जिथे अनेक जण सहसा ‘आर्म-रेसलिंग’च्या सामन्यांमध्ये भाग घेतात आणि चांगले शक्तिप्रदर्शन करणारा स्पर्धक प्रेक्षकांमार्फत महत्त्वपूर्ण दामही वसूल करतो.

या घटनेच्या रात्री काशिफ या स्पर्धकाला ‘आर्म रेसलिंग’ सामना सुरू असताना हा अपघात झाला. अहवालानुसार, दुखापतीनंतर संबंधित दोन्ही पक्षांनी वैद्यकीय खर्चासाठी ६०,००० रुपयांच्या करारान्वये हे प्रकरण मिटवले. काशिफला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले.

हेही वाचा… आता एकमेकींचा जीवच घेतील! कानाखाली मारलं, झिंज्या उपटल्या अन्…, तरुणींचा भररस्त्यात राडा, पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झालेला हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “हे पाहण्यासाठी खूप वेदनादायक आहे.” दुसऱ्याने “खेळ संपला” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “हे सर्व पाहून मलाच भीती वाटली.” एकाने, “हानिकारक खेळ, दुखापतीचा उच्च धोका”, अशीदेखील कमेंट केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of man broke his hand while arm wrestling viral video on social media dvr