Shocking video of a man chased a woman: जगभरात सगळीकडेच मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजच्या या प्रगत काळातही अनेक स्त्रिया, मुली असुरक्षितच असल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून, दिवसाढवळ्या अशी मानसिकता असलेले विकृत लोक मुलींचं अपहरण करतात, त्यांची छेड काढतात. अशा लोकांसाठी अजून कठोर कायदा केला पाहिजे, मुलींकडे वाईट नजरेनं बघणाऱ्या लोकांना कडक शिक्षा केली गेली पाहिजे, अशी मागणीही अनेकदा केली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजही अनेक ठिकाणी मुलींचं रात्री बाहेर फिरणं, कामावरून उशिरा घरी येणं असुरक्षितच आहे. कधी कुठे काय होईल ते सांगता येत नाही. रात्रीची वेळ लक्षात घेऊन, अशा वाईट विचारांचे लोक मुलींचं अपहरण करतात आणि त्यांचा गैरफायदा घेतात. सध्या अशीच काहीशी घटना एका ठिकाणी घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात मध्यरात्री कामावरून घरी येताना एक माणूस तरुणीचा पाठलाग करत असतो. नेमकं काय घडतं ते जाणून घेऊ…

हेही वाचा… काकी जरा दमानं! चालत्या ट्रेनला लटकली महिला, पुढे जे घडलं ते भयंकर, VIDEO पाहून कपाळावर माराल हात

महिलेचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओत एक महिला मध्यरात्री कामावरून घरी परतताना दिसतेय. घरी जात असताना तिच्या लक्षात येतं की, तिचा कोणीतरी पाठलाग करतंय. हे कळताच घाबरून न जाता, ती तिच्या खोलीत शिरते आणि लगेच खोलीचा दरवाजा लावून घेते. दरवाजा लावताच तो तरुण तिच्या घराबाहेर येतो आणि दरवाजा उघडण्यास सांगतो. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली ते अद्याप कळू शकलेले नाही.

सध्या चर्चेत असलेला हा व्हिडीओ @dark_page_for_you या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “ती खूप हुशारीने वागली” असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल २९.२ मिलियन व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… हा काय प्रकार! कारचालकाच्या ‘त्या’ कृतीमुळे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने फोडली कारची काच, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं?

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “आजकाल अविवाहित मुली फक्त त्यांच्या घरीच सुरक्षित आहेत, असं वाटतं.” तर, दुसऱ्यानं “त्या माणसाचं काय झालं कोणाला माहीत आहे का?”, अशी विचारणा केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “… आणि लोकांना अजूनही प्रश्न पडतो की, स्त्रिया पुरुषांना का घाबरतात?” तर एक जण कमेंट करत म्हणाला, “मी पाहिलेल्या सर्वांत भयानक व्हिडीओंपैकी हा एक आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of man chased a young woman to her house viral video on social media dvr