Train Food Video: आपल्यापैकी अनेकांनी भारतीय रेल्वेतून प्रवास केला असेल. लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर बसच्या तुलनेत रेल्वेच बरी पडते. कारण एकतर ती वेगानं धावते अन् सर्व प्रकारच्या सोयी सुविधा तुम्हाला रेल्वेमध्ये मिळतात.

रेल्वे प्रवासात अनेकदा आपण मोजकेच पदार्थ घेऊन जातो. कारण ट्रेनमध्ये अनेक खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. समोसा, ढोकळा, भेळ अशा प्रकारचे अनेक चमचमीत पदार्थ आपण भूक लागली की लगेच विकत घेतो. या पदार्थांचा प्रवाशी अगदी आनंदाने आस्वाद घेतात. पण तुम्हाला माहित आहे का की, हे पदार्थ नेमक्या कशा पद्धतीने बनवले जातात. हे पदार्थ बनवताना किती स्वच्छता पाळली जाते? नाही तर मग हा व्हायरल होणारा व्हिडीओ तुम्ही देखील एकदा पाहाच. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्ही देखील ट्रेनमध्ये काहीही खाण्यापूर्वी दोन वेळा विचार कराल.

विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकतो की, एक माणूस ट्रेनमधील टॉयलेटच्या बाहेर असलेल्या अस्वच्छ आणि घाणेर्ड्या जमिनीवर कांदे कापताना दिसतोय. अशा कांद्याचा वापर खाद्यपदार्थांमध्ये केल्याने याचा वाईट परिणाम प्रवाशांच्या आरोग्यावर होऊ शखतो. यामुळे अन्नातून विषबाधादेखील होऊ शकते. प्रवाशांच्या जीवाशी चालणारा हा खेळ कधी बंद होणार असा सवाल देखील अनेकांनी हा व्हिडीओ पाहून केला आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @pratikshakadam360 इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला “एका तरुणाने ट्रेनमध्ये घाणेरड्या बाथरूमजवळील जमिनीवर कांदे कापले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला.” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे सगळे आपल्याला मारूनच राहितील कधी ना कधी” तर दुसऱ्याने “ट्रेनमधील विक्रेते सगळे अशाप्रकारेच खाद्यपदार्थ बनवून विकतात” अशी कमेंट केली. तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं,