Shocking video of Artificial Eggs: अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. पण हो, त्यांचा प्रभाव गरम असतो, त्यामुळे लोक हिवाळ्यात अंडी अधिक खातात. पण ज्यांना अंडी खायला आवडतात, ते कोणत्याही ऋतूची पर्वा करत नाहीत. जिममध्ये जाणारे बहुतेक लोक त्यांच्या प्रोटीन डाएटला पूरक म्हणून त्यांच्या आहारात अंडी समाविष्ट करतात. पण जरा कल्पना करा की, तुमच्या जेवणाच्या ताटात ठेवलेली अंडी बनावट असतील किंवा त्यात प्लास्टिक मिसळले तर? घाबरलात ना? थांबा विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहा तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.
कोणत्याही खाद्यपदार्थात थोडीशी भेसळ देखील तुम्हाला आरोग्याच्या समस्येकडे ढकलू शकते. मात्र तरीही बाजारात कमी उत्पादन खर्चावर अधिक नफा मिळवण्यासाठी अनेक व्यापारी खाद्यपदार्थांच्या शुद्धतेशी छेडछाड करतात. अंडी देखील याला अपवाद नाहीत. अंड्यात सुद्धा भेसळ होते.
अंड्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांत बनावट अंड्यांच्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत. अंड्यातून प्लास्टिकसारखा पदार्थ बाहेर पडल्याने आणि त्यातून विचित्र वास आल्याने लोकांना हा संशय आला. तेव्हापासून, अनेकांच्या मनात भेसळयुक्त अंड्यांबाबत भीतीच निर्माण झाली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीला अंड शिजवल्यानंतर त्याचा अर्धा भाग प्लॅस्टिकचा तर अर्धा ओरिजनल असा मिळाला आहे. या व्यक्तीनी ही अंडी छत्रपती संभाजीनगरमधून घेतल्याचा दावा केला आहे. तसेच यापुढे अंडी विकत घेतल्यावर तपासायचंही आवाहन या व्यक्तीनं केलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही यापुढे अंडी खाताना नक्की विचार कराल.
पाहा व्हिडीओ
खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल
बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ chalu_wartha नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी प्रचंड संतापले असून कारवाईची मागणी करत आहेत.
घरीच या पद्धतीने तपासणी करून ओळखा प्लास्टिकच्या व ख-या अंड्यातील फरक
- अंडी हलवण्याचा प्रयत्न करा – जर त्यात काही आवाज येत असेल तर ते बनावट असू शकते.
- अंडी फोडा आणि पहा- असे करताना पिवळे आणि पांढरे भाग एकमेकांत मिसळले तर अंडी बनावट असू शकतात.
- एका ग्लास पाणी घेऊन त्यात अंडे ठेवा – असे म्हणतात की जर अंडे खरे असेल तर ते पाण्यात बुडते, तर नकली अंडे पाण्यात तरंगते.
- अंडी जाळण्याचा प्रयत्न करा – जर अंडे खरे असेल तर त्यावर फक्त एक काळी खूण दिसून येईल, जर ते बनावट असेल तर अंडी जळण्यास सुरवात होईल.