महिलांचा आदर करा, त्यांना सन्मानाने वागणूक द्या असे संस्कार लहानपणीच अनेकांवर होतात. पण, वर्षानुवर्षे होणाऱ्या अत्याचारावरून काही लोक त्यांचे हे संस्कार विसरलेले दिसतायत. सगळ्याच गोष्टींचं भान विसरून काही लोक आपली मर्यादा ओलांडतात आणि महिलांवर अत्याचार करतात. मग यावेळेस ते कोणाचीही पर्वा करत नाहीत. अगदी निर्लज्जाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणीदेखील अश्लील कृत्य करायला असे लोक मागेपुढे बघत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या अशीच एक संतापजनक घटना एका मेळ्यामध्ये घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका माणसाने भरगर्दीत तरुणीबरोबर अश्लील वर्तन केलं. नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊ या…

माणसाने ओलांडली मर्यादा

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमचाही राग अनावर होईल. या व्हिडीओमध्ये एका ठिकाणी मेळा भरलेला दिसतोय. या मेळ्यात माणसांची खूप गर्दीदेखील दिसत आहे. याच गर्दीचा फायदा एका विकृत माणसाने घेतला आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका तरुण मुलीच्या मागे उभं राहून एक माणूस अश्लील कृत्य करताना दिसतोय. एकदा नाही तर दोन तीनदा त्याचं हे अश्लील कृत्य सुरू आहे. भरगर्दीत सगळ्यांसमोर कशाचीही लाज न बाळगता हा माणूस त्या तरुणीची छेड काढतोय. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @sanatanadharma_._ इन्स्टाग्राम अकांउटवरून शेअर करण्यात आला असून सावधान, गर्दीच्या ठिकाणांपासून सावध राहा, अशा मानसिकतेच्या लोकांचं आपण काय करू शकतो अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ३.६ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

विकृत माणसाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “व्हिडीओ काढण्याऐवजी जर तिथेच त्याला चोपलं असतं तर…”, तर दुसऱ्याने “अशी परिस्थिती सध्या सगळीकडेच आहे” अशी कमेंट केली; तर
“अरे तुझ्या मुलीच्या वयाची ना ती” अशी एकाने कमेंट केली.