Train Viral Video: ट्रेनमधून दररोज असंख्य लोक प्रवास करत असतात. यादरम्यान, नेहमीच काही ना काही वेगळं पाहायला मिळतं. ट्रेनमध्ये अनेकदा अशा गोष्टी घडतात ज्या पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. ट्रेनमध्ये चोरी, ट्रेनला लटकून केलेले स्टंट असे अनेक ट्रेनसंदर्भातले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून अशा माणसांचं करायचं तरी काय हा प्रश्न पडतो. पण सध्या याहून भयंकर आणि विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात एका माणसाने हद्दच पार केली आहे. या माणसाने ट्रेनमध्ये सगळ्यांसमोर जे केलं ते पाहून तुम्हीदेखील कपाळावर हात माराल. नेमकं काय घडलं, जाणून घ्या…
माणसाने हद्दच पार केली…
ट्रेनमध्ये अनेक विचित्र घटना घडताना आपण पाहिल्या असतील. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही घटना पाहून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक माणूस चक्क ट्रेनच्या खिडकीतून लघवी करताना दिसतोय. ट्रेन एका ठिकाणी थांबलेली आहे आणि हा इसम कसलीही लाज न बाळगता सगळ्यांसमोर थेट ट्रेनच्या खिडकीतून लघवी करताना दिसतोय. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अजून समोर आलेलं नाही.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @filmyindia03 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला “टॉयलेट काय असतं…” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.२ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अशा लोकांना तुरुंगवास आणि मोठा दंड झाला पाहिजे.”, तर दुसऱ्याने “समाजात राहण्याच्या लायकीचा नाही आहेत असे लोक, अशांना जंगलात पाठवलं पाहिजे.” अशी कमेंट केली; तर एकाने कमेंट करत लिहिलं, “एक भारतीय म्हणून, असे वर्तन पाहून मला खूप निराशा वाटते.”
दरम्यान, ट्रेनमध्ये याआधीही अशा विचित्र घटना घडल्या आहेत, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्याची ही घटना चर्चेत असल्याने नेटकऱ्यांनी या माणसावर कारवाई करण्याची मागणी कमेंट्स करत केली आहे.