Shocking Video: काही लोक असे असतात, ज्यांना दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद मिळतो. अशी विकृत मानसिकतेचे लोक समाजात सध्या वाढतच चालले आहेत. अशा लोकांना कधीच दुसऱ्यांचं सुख बघवत नाही. मग त्यांना त्रास देण्यासाठी ते कुठल्याही थराला जातात.

आपण अनेकदा बातम्यांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये तसंच सोशल मीडियावर अशा धक्कादायक घटना बघत असतो. सध्या अशीच घटना एका ठिकाणी घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या घटनेत एक माणसाने तरुणीच्या स्कर्टला मुद्दाम आग लावली.

माणसाने हद्दच पार केली… (Man sets woman’s skirt on fire)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही राग अनावर होईल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका महिलेच्या नकळत एका माणसाने तिच्या शॉर्ट स्कर्टला आग लावली आहे. व्हिडीओमध्ये महिला रस्त्याच्या कडेला उभी राहिलेली दिसतेय. तिच्या नकळत हा माणूस लायटरने तिच्या स्कर्टला आग लावतो. आग सुरूवातीला कमी असल्याने महिलेला आधी कळत नाही. पण जेव्हा तिला चटके जाणवू लागतात, तेव्हा ती लगेच आग विझवण्याचा प्रयत्न करते. तो माणूस तिथे बसून तिची अवस्था बघत राहतो. पण स्वत: काय तिला मदत करायला तो पुढे जात नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @teknologyoo या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “मी काही बोललो तर वाद होईल,” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २ मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया

तरुणीचा हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “गुन्हेगारी कृत्य, खुनाचा प्रयत्न म्हणून पोलिसांकडे तक्रार करा त्याची”; तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तुम्हाला लाज नाही वाटत, दुसऱ्याला असा त्रास देताना, अशा कृत्यामुळे समोरच्याचा जीवदेखील जाऊ शकतो”, तर तिसऱ्याने “याची तक्रार पोलिसांकडे केली पाहिजे आणि याच्यावर कारवाई करायला हवी” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “अशा विकृतांना ठेचलं पाहिजे.”