लग्नसमारंभात जायला कोणाला नाही आवडतं. या लग्नसोहळ्यात अनेकांना नव्या नवरा नवरीला बघण्याची उत्सुकता असते तर काहींना तिथल्या जेवणाची उत्सुकता असते. अनेकजण तर मस्त असं पंचपक्वान्न असेल याच हिशोबाने त्या लग्नसोहळ्याला हजेरी लावतात. अगदी आवडीने तिथल्या सगळ्या डिश ट्राय करतात आणि मनसोक्त घरी परतात. पण जर तुम्हाला कळलं की, तुम्ही जेवलेल्या त्याच जेवणात कोणीतरी थुंकलं असेल तर…, वाचूनच अगदी किळसवाणं वाटतंय ना…, पण हे असं एका लग्नात घडलंय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमकं काय केलंय या आचाऱ्याने जाणून घेऊया…
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक विचित्र व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका लग्नात एक आचारी पोळ्यांवर थुंकताना दिसत आहे. शहरातील भोजपूर पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली.
मंगळवारी समोर आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे.
किळसवाणा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका लग्नात जेवण बनवणारा एक माणूस पोळी बनवण्यापूर्वी त्यामध्ये थुंकताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजपूरमध्ये विनोद कुमार यांच्या मुलीच्या लग्नादरम्यान ही घटना घडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेतली.
ही घटना २० फेब्रुवारी रोजी घडल्याची पुष्टी पोलिसांनी केली. अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि आरोपीला अटक केली. आरोपीची ओळख फरमान अशी झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
गाझियाबाद ग्रामीण पोलिस अधिकाऱ्याचे विधान:
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @News1IndiaTweet या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अगदी बरोबर केलं, याला अटक झाली ते बरं झालं”. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “अशी हिंमतच कशी होती यांची”