Shocking Video of Suicide: गेल्या काही वर्षांत आत्महत्यांचं प्रमाण वाढत चालल्याचं दिसून येतंय. मानसिक तणावातून अनेक लोक आता आत्महत्येचा पर्याय निवडू लागले आहेत. काही लोकांना स्वत:चंच आयुष्य जड झाल्यासारखं वाटू लागलं आहे. आयुष्यात होणाऱ्या त्रासाला कंटाळून लोक टोकाचा निर्णय घेऊन स्वत:ला संपवतायत. अशात आत्महत्येबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ पाहून काळजाचा ठोकाच चुकतो.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका माणसाने स्वत:लाच संपवण्याचा विचार केलाय; नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या…

धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका ठिकाणी रस्त्याच्या मधोमध एक माणूस स्वत:वर पेट्रोल ओतून घेताना दिसतोय. रस्त्याच्या आजूबाजूने अनेक माणसं येता-जाताना दिसतायत. पण कोणीही पुढे जाऊन त्या माणसाची विचारपूस करत नाहीय. तो स्वत:ला संपवणार इतक्यात एक माणूस पुढे येतो आणि त्याला मिठी मारतो. मिठी मारताच तो माणूस रडू लागतो. दरम्यान, ही धक्कादायक घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @marathiveda या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला “जर तुम्हाला इतरांच्या वेदना जाणवत असतील तर तुम्ही माणूस आहात” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला ३४ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आपल्याला तोच माणूस समजू शकतो ज्याने हे सगळं अनुभवलं आहे” तर दुसऱ्याने “तमाशा बघणारे नालायक लोकं, वाट बघत होते की काय…” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “मानलं भावा तुला एखाद्याचा जीव वाचवलासं” तर एकाने “आजकाल हेच चाललंय मरणारा मरतोय, लोक बघतात.. पण कोणी येत नाही, तोच माणूस पुढे येतो ज्याला दुसऱ्याच दु: ख कळत”अशी कमेंट केली.