Mobile caught fire: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपल्याला थक्क करणारे असतात, जे आपल्या कायमचे लक्षात राहतात. या डिजिटल युगात व्हिडीओ व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.

अनेक वर्षांपासून जसजसा मोबाईलचा वापर वाढत गेला, तसतशा अनेक दुर्घटनाही वाढत गेल्या. सोशल मीडियावर अशा दुर्घटनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचेही आपण पाहिलेच असतील. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यात एका तरुणाच्या मोबाईलमधून अचानक धूर निघू लागला. नेमकं घडलं तरी काय, जाणून घेऊ..

तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुण आपल्या बाईकच्या बाजूला उभा असतो. तेवढ्यात अचानक तरुणाच्या पॅन्टच्या खिशातून धूर निघू लागतो. धूर निघू लागताच तरुण खिसा तपासतो आणि त्यातून आपला मोबाईल बाहेर काढतो. मोबाइलमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असतो. तरुण लगेच फोन जमिनीवर फेकून देतो. मोबाईलमधून धूर निघत असल्याने तो कोणत्याही क्षणी पेट घेईल या भीतीने तरुण आपला बचाव करतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @vishvermaofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला ‘जास्त गरम झाल्यामुळे मोबाईलला आग लागली…’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल ७.७ दसलक्ष व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे आणि कधी घडली हे अद्याप कळू शकलं नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “बापरे, नशीब आग नाही लागली”. तर दुसऱ्याने, “त्यानं मोबाईलच्या मागे नोट ठेवली असेल म्हणून असं झालं असेल”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “व्हिडीओ बनवणारा आग लागण्याची वाट पाहत होता काय?”

Story img Loader