तुम्ही कधी हरीण पाण्यावर चालताना पाहिले आहे का? होय, असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक हरीण पाण्यावर सरसर धावताना दिसत आहे. खरं तर एखादे हरीण पाण्यावर धावतेय याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून सर्वांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. या हरिणाला पाहून तुम्ही देखील हे नक्की म्हणाल की त्यांच्यामध्ये सुपरपॉवर आहे. या हरिणाचा पाण्यावर धावतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
वास्तविक, व्हिडीओमध्ये हरणाच्या प्रजातीच्या सदस्य असलेला मूस पाण्यावर वाऱ्याच्या वेगाने धावताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुरून घोड्यासारखा दिसणारा मूस पाण्यावरून कसा सरसर धावत आहे. त्याला पाहताना वाटतं जणू तो जमिनीवर धावत आहे. कारण त्याचे पाय पाण्यात बुडत नाही आहेत. पाण्यात एक बोट देखील दिसत आहे. अशा स्थितीत नदी खोल असणार हे साहजिकच आहे, मात्र असे असतानाही पाण्यात हरणं न बुडणे हे आश्चर्यापेक्षा कमी नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल की हे खरोखरच घडले आहे की व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे. तसं, हा व्हिडीओ एडिट केलेला दिसत नाही.
( हे ही वाचा: Video: अपंग महिलेच्या जिद्दीला सलाम! व्हीलचेअरवरून करतेय फूड डिलिव्हरी; नेटकर्यांनी केले कौतुक)
हरिणाचा धावतानाचा व्हिडीओ एकदा पाहाच..
( हे ही वाचा: राहुल गांधींनी ४१ हजारांचा टी-शर्ट घातला? भाजपच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावरही रंगली चर्चा)
हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर Curiosity Of Science नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. हा ११ सेकंदाचा व्हिडीओ आतापर्यंत ४.५ दशलक्ष म्हणजेच ४५ लाख वेळा पाहिला गेला आहे, तर एक लाखाहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक देखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.