आई आणि तिच्या लेकरांचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकरांना जपणारी आई प्रत्यही अनेकदा संकटांना सामोरी जात असते. अगदी जन्म दिल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत आई आपल्या मुलांना सांभाळते, त्यांचं रक्षण करते. लहान-मोठ्या सगळ्या संकटांत ती आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आपल्या लेकराला कुठे खरचटलं तरी आईचा जीव वर-खाली होतो. पण जर याच आईने आपल्या मुलाचा जीव धोक्यात घातला तर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात आईची एक चूक तिच्या मुलीच्या आयुष्यावर बेतू शकते. नेमकं घडलंय काय, जाणून घेऊ या…

आईच्या निष्काळजीपणाचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्काच बसेल. या व्हिडीओमध्ये असं दिसतंय. की एक आई आपल्या लहान लेकीला घेऊन स्कूटर चालवत आहे. चिमुकली आईच्या मागे बसून तिला घट्ट पकडून बसली आहे. तसंच असंही दिसतंय की त्या मुलीला झोपदेखील लागली आहे. आईच्या या निष्काळजीपणावर एका माणसाने आवाज उठवला आहे. एक बाईकस्वार तिच्याजवळ मागून येतो, हॉर्न देत तिचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तिला म्हणतो, बाजूला घ्या गाडी.

“ती मागे झोपली आहे, तुम्ही हद्दच पार करता.” असंही तो त्या महिलेला म्हणतो. पण बाईकस्वाराला न जुमानता ती तिथून वेगात गाडी नेत निघून जाते. त्याचं म्हणण ऐकून न ऐकल्यासारखं करते आणि स्वत:बरोबरच आपल्या लेकीचाही जीव धोक्यात टाकते.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @tejalmodi454 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “निष्काळजी आई” अशी कॅप्शन देण्यात आली आहे तर व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ९ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं की, “काही लोक गर्विष्ठ असतात आणि त्यांना कोणी योग्य गोष्ट सांगितली तरी ती समजत नाही.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, या आईलातर तिच्या मुलाची काही पडलीच नाहीय अगदी बेफिकीर आहे. तर तिसऱ्याने “थोडासा उशीर होईल पण लेकरू गेलं तर सगळंच संपेल” अशी कमेंट केली.