Viral video: मुंबईतील कळवा येथील रेल्वे स्टेशनच्या बाहेर काही रिक्षाचालक भरदिवसा चरस गांजा ओढतानाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यासंदर्भात रोज आपल्याला काहींना काही ऐकायला येते. थोडे दिवसाआधी मुंबई लोकलमध्ये एक माणूस गांजा ओढताना दिसला होता आणि त्याचा व्हिडिओ देखील वायरल झाला होता. आता परत एकदा ठाण्याच्या कळवा येथील रेल्वे स्टेशनच्या बाहेर काही रिक्षाचालक भरदिवसा चरस गांजा ओढत आहेत. त्या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला असून यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबईतील कळवा रेल्वे स्टेशनवरील असून रिक्षा स्टँडवर तीन चार रिक्षा चालक गांजा ओढताना दिसत आहेत. तिथेच उभा असलेल्या एका व्यक्तीने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे. या प्रकारानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मादक द्रव्याची विक्री कुणाच्या आशिर्वादाने होते असा सवाल नागरिकांनी यानंतर उपस्थित केला आहे. नशे मध्ये महिलाची छेडछाड किंवा कुठलाही गुन्हा घडू शकतो याची पोलिस प्रशासनाने नोंद घ्यावी.” अशी मागणी करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: नवरीनं उष्टा लाडू खाण्यास दिला नकार, संतापलेल्या नवऱ्यानं भर मांडवात पकडला गळा अन्…

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कळवा पोलिसांनी याची दखल घेत तात्काळ अॅक्शन घेत या रिक्षा चालकांचा शोध घेत त्यांना तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणी ३ जणांवर NDPS एक्ट नुसार कारवाई करण्यात आली असून तर त्यांचा चौथा साथीदार फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा कळवा पोलिसांनी दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of mumbai kalwa auto rickshaw drivers smoking ganja drugs outside railway station video viral srk