Lion attack viral video: आपण सर्वांनी प्राणीसंग्रहालयांमध्ये पिंजऱ्याच्या आत बंद असलेले वाघ, सिंह आणि बिबट्या असे हिंस्त्र प्राणी पाहिले असतील. मात्र हेच प्राणी जर अचानक समोर आले तर कोणाचीही अवस्था खराब होईल. मात्र, हे प्राणी पिंजऱ्यात बंद असताना काही लोक त्यांच्याजवळ जात त्यांच्यासोबत मस्ती करण्याचा आणि या प्राण्यांची खोड काढण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या पाकिस्तानमधून अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सिंह, वाघ, चित्ता किंवा इतर जंगली प्राण्यांना व्हिडिओमध्ये पाहिल्यावर आपण त्यांच्या प्रेमात पडतो, मात्र प्रत्यक्षात ते समोर आल्यावर भीतीने आपली हवा टाईट होते. पिंजऱ्यात बंदिस्त असूनही सिंह हा सिंह असतो, त्यामुळे त्याच्यापासून दूर राहण्यातच शहाणपण आहे. पण जेव्हा अतिहुशार लोक सिंहाशी पंगा घेतात तेव्हा ते त्यांच्या चांगलंच अंगलट येतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती सिंहासोबत मजा करताना दिसत आहे. मात्र त्यानंतर सिंहाने जे केले ते पाहून तुमचा थरकाप उडेल.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंहाने पिंजऱ्यात असलेल्या व्यक्तीवर हल्ला केला आहे, त्यानंतर ती व्यक्ती जोरजोरात ओरडताना दिसत आहे. हा माणूस सिंहाच्या मालकासह पिंजऱ्यात गेला असता सिंहाने त्याच्यावर हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. यादरम्यान, सिंहाने त्या माणसाचा पाय आपल्या नख्यात पकडला आणि त्याच्या पायला चावला. त्यामुळे तो माणूस वाईटरित्या किंचाळू लागला आणि त्याला घाम फुटला. आता ती व्यक्ती सिंहाला कधीच हलक्यात घेणार नाही हे निश्चित. यावेळी सिंहाचा मालक माणसाला सिंहापासून मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “अरे जगायचं की नाही” ट्रॅफिकमुळे फुटपाथवर चालवत होता रिक्षा; तेवढ्यात तोल गेला, लोकांना चिरडलं अन्…भयानक VIDEO
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाकिस्तानमधील कंटेंट क्रिएटर मियां अझहरने शेअर केला आहे, जो सिंह, वाघ यांसारख्या प्राण्यांसोबत खेळतानाचे व्हिडिओ शेअर करत असतो. मियां अझहर महमूद नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत ४४.७ दशलक्षाहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे, तर अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओवर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले…भाऊ, सिंह हा सिंह असतो, तुम्ही पिंजऱ्यात का घुसलात.