Accident Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की अंगावर काटा येतो.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. य व्हिडीओमध्ये रस्त्या ओलांडणाऱ्या दुचाकीला एका कारने जोरदार धडक दिलेली दिसत आहे. ही संपूर्ण घटना कारच्या डॅश कॅमेरामध्ये कैद झाली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही क्षणभरासाठी स्तब्ध व्हाल. हा व्हिडीओ पालघर येथील आहे.
अनेकदा असे अपघाताचे व्हिडीओ समोर येतात की नेमकी चूक कोणाची, हे कळत नाही. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हाच प्रश्न पडेल की नेमकी चूक कोणाची आहे. कारण कार सुद्धा भरधाव वेगाने जाताना दिसत आहे आणि दुचाकी सुद्धा अतिशय वेगाने निष्काळजीपणाने रस्ता ओलांडताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ पालघर येथील एका रसत्यावरचा आहे. व्हिडीओत तुम्हाला एक कार दिसेल. कारचा डॅश कॅमेरा सुरू आहे. त्यामुळे कारच्या समोरील रस्त्यावरचे दृश्य आपण सहज पाहू शकतो. कार अतिशय वेगावे चालवत आहे. अचानक एक दुचाकी मध्ये रस्ता ओलांडण्यासाठी आणि तितक्यात ही भरधाव वेगाने जात असते आणि कार दुचाकीला धडकते. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. रस्ता ओलांडताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला नीट पाहणे गरजेचे आहे नाहीतर एक छोटीशी चूक जीवावर बेतू शकते.
Roads of Mumbai या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये विचारलेय, “कोणाची चूक आहे? पालघर, महाराष्ट्र” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दुचाकी चालकाची चूक आहे” तर एका युजरने लिहिलेय, “दोघांची चूक आहे कारण कार चालक खूप वेगाने कार चालवत होता आणि दुचाकी चालकाने नीट बघून रस्ता ओलांडणे गरजेचे होते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “दुचाकी चालकाने हेल्मेट घालायला पाहिजे होते” काही युजर्सनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. एक युजर लिहितो, ” निष्काळजीपणामुळे असे अपघात नेहमीच घडत असतात.”