Shocking robbery video: सध्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. दिवसाढवळ्या चोर घरात घुसून चोरी करू लागले आहेत. तर कधी रेल्वेमध्ये पाकीटमार, दुकानात चोरी करणाऱ्या चोरांची दहशत वाढू लागली आहे. अगदी कसलीच पर्वा न करता, हे चोर हातचलाखीने चोरी करून दुसऱ्याचं नुकसान करून निघून जातात. अनेकदा यांच्यावर कारवाई होते; पण अनेकदा काही चोर हाताला लागत नाहीत आणि असं कृत्य पुन्हा पुन्हा करीत राहतात.

सोशल मीडियावर अशा चोरीच्या घटनांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. सध्या चोरीची अशीच एक घटना एका दुकानात घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या दुकानात दोन चोरट्यांनी अगदी चलाखीने चोरी केली आणि तिथून पळ काढला. नेमकं काय घडलं, ते घ्या जाणून…

अशी चोरी कधीच पाहिली नसेल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये दोन माणसं एका दुकानात चोरी करण्यासाठी येतात. त्यातला एक माणूस टॉवेल बघत असताना दुकानदाराची दिशाभूल करतो आणि ड्रॉवरमधले काही पैसे चोरी करतो आणि चलाखीने ते आपल्या खिशात ठेवतो. चोरी करून झाल्यानंतर तो त्याच्या साथीदारासह तिथून निघून जातो.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/reel/DF7FaQkREr3/?igsh=eXN3cHY4eWE0Nzkw

चोरीच्या घटनेचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ @shakeelrulsbreaker या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्युज त्यावर आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “तुम्हाला काय वाटतंय की, आपला देश प्रगती करत नाहीये?” दुसऱ्यानं “त्यानं ते टॉवेल तरी खरेदी करायला हवं होतं,” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “काय मिळालं तुम्हाला चोरी करून.”

Story img Loader