Son abandons elderly parents: आई-वडिलांची सेवा करण्यासारखं पुण्य कुठेच नसतं, असं म्हणतात. मुलांचं आयुष्य सुखकर व्हावं यासाठी आई-वडील जीवाचं रान करीत असतात. त्यात गरिबी वाट्याला आली की, अखंड मेहनत घेऊन मुलांना वाढविण्याची जबाबदारी आई-वडिलांवर येते.

लहानपणापासून केलेले हट्ट असो वा मोठेपणी केलेल्या तक्रारी असो आई-वडील मुलांच्या सगळ्याच गोष्टी सांभाळून घेतात. पण, काही मुलांनाच आई-वडिलांनी केलेले कष्ट दिसतात आणि म्हणूनच ते त्यांचा आदर करून, आयुष्यभर त्यांना जपतात. पण ज्यांना आई-वडिलांनी त्यांच्यासाठी सोसलेले हाल आणि घेतलेले कष्ट स्मरत नाहीत, ते उतारवयात आपल्या पालकांची जबाबदारी घ्यायला नकार देतात. जेव्हा त्यांना त्यांच्या मुलांची सर्वांत जास्त गरज असते तेव्हाच त्यांना एकटे सोडतात.

सध्या असाच प्रकार एका वयोवृद्ध आई-वडिलांबरोबर घडलाय… एका मुलाने त्याच्या आई-वडिलांना रस्त्यात सोडून दिले.

वयोवृद्ध आई वडिलांना रस्त्यावर सोडलं

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमच्याही जीवाची घालमेल होईल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, बाईकवरूनएक मुलगा आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांना रस्त्यात मधेच सोडतो. त्यांचं सामान रस्त्यावर फेकून देतो आणि त्यांना तिथेच एकटं टाकून निघून जातो. ते वयोवृद्ध आई-वडील त्यांचं सामान उचलतात आणि तिथून निघून जातात. यादरम्यान, त्यांच्या मनाला खूप वेदना झालेली दिसते आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आल्याचंही या व्हिडीओमध्ये दिसून येतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @ek_pravas_asa_pan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ‘आई-वडिलांना अनाथ आश्रमात सोडताना मुलगा’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला सात लाखांपेक्षा व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

आई वडिलांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “हा विडिओ पाहून खूप वाईट वाटलं” दुसऱ्याने, “त्याला थोडीही लाज वाटली नाही का आपल्या आई बापाला रस्त्यावर सोडायला”, असं म्हटलंय. तर एकानं, “कर्म फिरून येणार”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “अशा लोकांना जगण्याचा काहीच हक्क नाही, जे आई-बापाला असं रस्त्यावर सोडतात”.

Story img Loader