Shocking Video: वर्षानुवर्षं मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडिया, वृत्तपत्रं, बातम्या यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात अगदी लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत कोणीही सुरक्षित नाहीत.

अत्याचार करणारी विकृत माणसं स्वत:च्या मनाला वाटेल ते करतात. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार एका ठिकाणी घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक विक्रेता लहान मुलीशी अश्लील वर्तन करताना दिसतोय.

विक्रेत्याने ओलांडली मर्यादा

विक्रेत्याचा हा व्हिडीओ पाहून तुमचाही राग अनावर होईल. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी रस्त्यावर विक्रेताच्या ठेल्याजवळ उभी राहून त्यातल्या वस्तू पाहत असते. तेवढ्यात विक्रेता तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि असभ्य वर्तन करू लागतो. त्या लहानग्या मुलीला चुकीच्या ठिकाणी मुद्दाम स्पर्श करू लागतो.

मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. माहितीनुसार आरोपीचं नाव जगदीश असं आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ @brut.india या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “लैंगिक शोषण- अल्पवयीन मुलीशी अनुचित वर्तन केल्याचा आरोप असलेल्या एका विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली.” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.८ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “किशोरावस्थेत असताना माझ्यासोबतही असेच काहीसे घडले होते आणि तो माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक अनुभव आहे. कोणतीही मुलगी किंवा स्त्री, कोणत्याही वयात, अशा नराधमांपासून खरोखर सुरक्षित नाही.” तर दुसऱ्याने “लोक त्या लहान मुलीला वाचवण्यापेक्षा तिचा व्हिडीओ काढण्यात व्यस्त आहेत.” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “कृपया त्याला योग्य शिक्षा द्या”