११ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांवर दडपण येतंच. अनेकांनी खूप अभ्यास करून प्रचंड मेहनत घेतलेली असते. याच परीक्षेला घाबरून आणि नापास होण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थी चुकीचं पाऊल उचलतात आणि कॉपी करण्याचा निर्णय घेतात. त्यांची ही एक चूक त्यांचं आयुष्य सुधारत नाही तर बिघडवूच शकते.
सध्या तर विद्यार्थ्यांमध्ये कॉपी करण्याचं प्रमाण वाढत चाललंय. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका विद्यार्थ्याने परीक्षेत कॉपी तर केलीच आहे, पण त्याच्यानंतर त्याची हिंमत एवढी वाढली की, त्याने चिट शीट्स थेट सीसीटीव्ही कॅमेरासमोर दाखवत ‘कूल’ बनण्याचा प्रयत्न केला आहे.
विद्यार्थ्याचा व्हिडीओ व्हायरल
एका विद्यार्थ्याने परीक्षेच्या खोलीतील सीसीटीव्हीमध्ये यशस्वीरित्या कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याची कॉपी चिट्स दाखवतानाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी यावर संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे आजच्या तरुणांच्या मूल्यांबद्दल वादविवाद सुरू झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक विद्यार्थी सीसीटीव्ही कॅमेरासमोर चिट शीट्स दाखवताना दिसतोय. परीक्षा संपल्यानंतर हा विद्यार्थी वर्गातून बाहेर निघण्याआधी सीसीटीव्ही कॅमेरासमोर चिट शीट्स दाखवतो. एक एक चिट दाखवत तो कॅमेरासमोर काहीतरी बोलत असतो. चिट दाखवल्यानंतर त्या चिट्स तो खाली फेकून देतो.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @love.connection_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘परीक्षा संपल्यानंतर सीसीटीव्हीमध्ये विद्यार्थी चिट शीट्स दाखवताना दिसत आहे’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच या व्हिडीओला तब्बल २.३ मिलियन व्ह्युज आले आहेत. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बाळा, परीक्षा संपली आहे, रिझल्ट यायचा अजून बाकी आहे” दुसऱ्याने कमेंट करत लिहिले, “आज कालच्या मुलांना कसलीच भीती उरली नाहीय” एकाने, “कृपया या मुलावर कारवाई करा.” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “मी नसतो कोणाला घाबरत, अशाप्रकारचा अॅटीट्यूड दिसतोय याचा”,