शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं गुरु-शिष्याप्रमाणे असतं. शिक्षकाकडून मिळालेली विद्येची शिदोरी आयुष्यभर जोपासण हे खरंतर विद्यार्थ्याचं काम. लहानपणी अनेकांनी शिक्षकांचा ओरडा खाल्ला असेल, मार खाल्ला असेल; पण कधीही शिक्षकांचा अनादर करणं आपल्याला शिकवलं जात नाही. विद्यार्थ्यांना शिक्षकांविषयी खूप जास्त आदर असतो. आई-वडिलांनंतर जर आपण कोणाचं ऐकतो तर ते शिक्षक असतात. पण, जर शिक्षकानेच मर्यादा ओलांडल्या तर… , कारण या कलियुगात कधी काय घडेल ते सांगता येत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या शिक्षकाच्या अश्लील वर्तनाची एक धक्कादायक घटना एका ठिकाणी घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक शिक्षक चक्क दारू पिऊन विद्यार्थी असलेल्या वर्गात झोपला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊ या…

विद्यार्थ्यांसमोर दारूच्या नशेत आला अन्…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपण पाहू शकतो की शाळेत भरवर्गात एक शिक्षक खुर्चीवर निपचित पडून आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओच्या कॅप्शननुसार शिक्षक दारू पिऊन आला आणि वर्गात झोपून गेला. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, विद्यार्थी शिक्षकाला उठवताना दिसतायत. पण तरीही शिक्षक काही जागचा हलत नाहीय. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @newrative या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “शिक्षक दारू पिऊन शाळेत आला आणि झोपी गेला. विद्यार्थ्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला.” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.६ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मुले मोठी झाली की त्यांना आठवेल आपले शिक्षक पिऊन शाळेत शिकवायला यायचे” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “कशावरून तो दारू पिऊन झोपी गेलाय आणि त्याला कोणता त्रास होत नाहीय” तर तिसऱ्याने “त्या शिक्षकाला झोपूदे, तुम्ही तुमचा फ्री पिरियट एन्जॉय करा” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “विचार केला तर हे खरंच वाईट वाटतं. बिचाऱ्या त्या शिक्षकाचं आयुष्य खडतर असेल.”