सोशल मीडियावर अनेकदा व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात अपघातांच्या व्हिडीओंचं प्रमाणही जास्त असतं. अशा अपघातांत माणसं एक तर गंभीर जखमी होतात किंवा त्यांना मृत्यूला तरी सामोरं जावं लागतं.
अनावधानाने घडलेली एक चूक माणसाचं आयुष्य धोक्यात टाकू शकते. सध्या अशीच एक धक्कादायक घटना एका ठिकाणी घडली आहे. त्या घटनेत एक महिला अचानक स्टेजवरून खाली कोसळते. तिच्याबरोबर नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊ…
महिलेचा भयंकर अपघात
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात एका स्टेजवर काही माणसं जमलेली दिसतायत. या स्टेजवर एक महिला काही जणांशी बोलताना दिसतेय. त्यानंतर ती महिला स्टेजवर असलेल्या खुर्चीवर बसायला जाणार इतक्यात एक माणूस त्यांना तिथून उठवतो. खुर्चीवरून उठल्यावर ती महिला पुन्हा एकदा कोणाशी तरी बोलायाला जाते आणि या सगळ्यात अचानक तिचा स्टेजवरून पाय घसरतो आणि ती स्टेजवरून खाली कोसळते. जमीन आणि स्टेज यामधील अंतर जास्त असल्यानं महिलेला गंभीर दुखापत झाली असल्याचं या व्हिडीओतून दिसून येतंय.
व्हिडीओची लिंक
https://www.instagram.com/reel/DEXWe3Ay26Q/?igsh=eGhycDJzcXB3bXFt
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/image_1609ef.png)
सोशल मीडयावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @noorulusf_editz_2.o या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला तब्बल ४.५ दशलक्ष व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे झालीय, हे अद्याप कळू शकलेले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “आयोजकांना शिक्षा झाली पाहिजे.” दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “ती सुरक्षित आहे का?” तर एकानं, “महिलेबरोबर खूप वाईट झालं” अशी कमेंट केली.