Shocking Accident video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत असतात. हेच व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात. तसेच येथे आपल्याला असे काही व्हिडीओदेखील पाहायला मिळतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालवली तरी समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे अपघात होतो आणि आपली काहीही चूक नसतानाही आपल्याला दुखापत होते. रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांची कमी नाही, त्यांना वारंवार सांगूनही तरुण बेशिस्तपणे वाहनं चालवतात. याचा अनेकदा त्यांना फटका बसतो, अद्दल घडते मात्र तरीही ते काही ऐकत नाहीत. अशाच काही तरुणांना रस्त्यावर बेशिस्तपणे गाडी चालवून इतरांना दिलेल्या त्रासाचं फळ क्षणात मिळालं आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.

‘जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर’; आपण जे वागतो, बालतो, तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलं आहे. तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर तुम्हालाही कुणीतरी त्रास देईल किंवा तुम्ही एखाद्यासोबत चुकीचं केलं, तर उद्या किंवा एक दिवस तुमच्यासोबतही ते घडू शकतं. जसं करावं तसं भरावं, अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेक जण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते. याला आपण ‘जसे कर्म, तसे फळ‘, असे म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, एखाद्याचं आपण वाईट केलं तर आपल्या बाबतीतही वाईटच घडतं. याचं ताजं उदाहरण देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर सर्वत्र गाड्यांची वर्दळ दिसत आहे. अशातच तीन तरुण बाईकवरून येतात आणि अचानक रस्त्याच्या मध्येच गाडी आणतात. यावेळी सरळ जाणाऱ्या गाड्यांमध्ये ही बाईक आल्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, चालकांनी ब्रेक मारल्यानं अपघात झाला नाही. दरम्यान, पुढेही हे तरुण वाहतुकीचे नियम मोडून बाईक चालवत होते, तेवढ्यात त्यांचा तोल जातो आणि तिघेही बाईकसकट खाली कोसळतात. तिघांनाही जोरदार मार लागल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. कुणाला विनाकारण त्रास दिल्यावर काय होतं हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि सांगा यावर तुम्हाला काय वाटतं?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बॉयफ्रेंडला भेटायला बोलावणे तरुणीला पडले महागात; घरचे येताच कुठे लपवलं पाहा; VIDEO बघून व्हाल अवाक्

सोशल मीडियावर हा व्हिडीओ roadsafetycontent नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना युजरने व्हिडीओवर, “जेव्हा कर्माचे फळ लगेच मिळते” असं कॅप्शन लिहिलं आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “सगळ्यांनी गाडी चालवताना काळजी घेतली पाहिजे.”