Tiger Attacks Woman Video: जंगलाचा राजा सिंह असला तरी सगळ्यांनाच सिंहाबरोबरच वाघाचीही दहशत वाटत असते. जंगलातील कुठल्याही प्राण्यापासून माणसं चार हात लांबच राहतात. पण, वाघाचं नाव जरी ऐकलं तरी अनेकांना घाम फुटतो. जंगली प्राण्यांची ही भीती अनेकांच्या मनात कायम असते.
आपण अनेकदा सिनेमांमध्ये असे प्राणी फार फार तर पाहतो. पण, विचार करा जर तुमच्यासमोर प्रत्यक्षात अचानक वाघ आला आणि त्यानेकाही विचार करण्यापूर्वीच तुमच्यावर हल्ला केला तर… सध्या असाच एक भयंकर प्रकार एका महिलेबरोबर घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत महिलेबरोबर नेमकं काय घडलंय ते पाहा…
वाघाचा हल्ला (Tiger Attack Video)
महिलेचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका कारमध्ये नवरा-बायको बसलेले असतात. अचानक रस्त्याच्या कडेला दोघे गाडी थांबवतात आणि बायको कारमधून बाहेर उतरते. बाहेर उतरताच तिथे अचानक एक वाघ येतो आणि तिच्यावर हल्ला करतो. तिला खेचत घेऊन जात असतानाच नवरा लगेच कारमधून बाहेर पडतो आणि वाघाच्या मागे पळतो. दरम्यान, ही धक्कादायक घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला व्हिडीओ @pratahkal.live या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ‘पतीशी भांडण झाल्यानंतर महिला गाडीतून उतरली, वाघ तिला जंगलात ओढत घेऊन गेला…’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसेच व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल २.५ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
महिलेचा हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “पतीच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. इतका मोठा वाघ पाहिल्यावर आपल्या जीवाची पर्वा न करता, तो बाहेर पडला”. तर दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “नवऱ्यानं एकदाही स्वत:चा विचार नाही केला आणि आपल्या पत्नीला वाचवायला तो धावत सुटला”. तिसऱ्यानं, “आयुष्याचा काही भरवसा नाही”, अशी कमेंट केली.