Viral video: एखाद्या वाहनचालकानं थोडाही नियम चुकवला, की वाहतूक पोलीस कायद्याचा बडगा उगारीत त्यावर दंडात्मक कारवाई करतात. पोलीस वारंवार नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत असतात. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत असतात. मात्र नागरिकांकडून नियमांचं पालन करण्याची अपेक्षा असताना मात्र पोलीसच कायदा मोडत असतील, तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे.ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करणं हे प्रत्येक वाहन चालकासाठी बंधनकारक आहे. वाहतूकीचे नियम न पाळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र काहीवेळा वाहतूकाचे नियम मोडणारेच पोलिसांसमोर आडीबाजी करतात. अशावेळी वाद होतात आणि त्याचे परिणाम चुकीचे होतात. दरम्यान आता पुन्हा एका वाहतूक पोलीस चर्चेचा विषय बनलेत. यामध्ये पोलीसांवर आरोप केले आहेत.

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमधील व्यक्ती ट्रॅफिक पोलिसांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतोय. लहान वाहन असतानाही या पोलीसानं अवजड वाहन सांगून दंड आकारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्या वाहनाचा चालक पोलिसांना दंड आकारण्याचं उघड आव्हान देतोय. म्हणतोय, हिंमत असेल तर पावती फाडा. मी तुम्हाला कोर्टात खेचणार. चला जाणून घेऊयात नक्की प्रकरण काय आहे.

या व्हिडीओमधील वाद अवजड वाहनांसंदर्भात आकारल्या जाणाऱ्या या दंडावरूनच होत असल्याचं पाहायला मिळतेय. असो, पण हा व्हिडीओ पाहून बहुसंख्य नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. आणि अशा पोलिसांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करत आहेत. या व्हिडीओमधील व्यक्ती ट्रॅफिक पोलिसांसोबत भांडताना दिसत आहे. या व्यक्तीनं केलेल्या आरोपानुसार पोलिसांनी त्याच्या गाडीला अवजड वाहन सांगून दंड आकारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो व्यक्ती पोलिसांना थेट दंड आकारण्याचं आव्हान देत आहे. “हिंमत असेल तर पावती फाडा मी तुम्हाला सोडणार नाही. थेट कोर्टात खेचेन” असा धमकीवजा इशारा त्यानं दिला. दरम्यान पोलीस त्याला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gdeshmukh1984 या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही घटना नेमकी कुठे घडलीये याबाबत कुठलाही उल्लेख नाही. पण या व्हिडीओमध्ये ट्रॅफिक पोलिसांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले जात आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “मराठी लोकांनी जगायचं की नाही?” तर आणखी एकानं, “बाहेरच्या राज्यातल्या वाहनांवर/परप्रांतीयांवर पोलिस कारवाई करत नाहीत, पण स्थानिक नागरिकांना त्रास देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. मागे मला अडवल ३ सीट घेऊन होतो म्हणून पण बाजूने ४ सीट घेऊन जाणाऱ्या रिक्षांवर कारवाई करा म्हटल्यावर न ऐकल्यासारखं केलं.”