Shocking Video: सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून अनेकदा आपल्याला आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात लोकांच्या जीवाशी हा सर्रास खेळ सुरू असल्याचं दिसून येतंय. एका मेडिकल कॉलेजमध्ये जेवण बनवण्यासाठी चक्क टॉयलेटचं पाणी वापरलं आहे. नेमकं काय प्रकरण आहे हे, जाणून घेऊ या…
मेडिकल कॉलेजमध्ये किळसवाणा प्रकार
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये मध्य प्रदेशातील एका मेडिकल कॉलेजमध्ये जेवणासाठी टॉयलेटमधलं पाणी वापरलं जातंय असं दिसून आलं. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, टॉयलेटमधील एका नळाला पाईप जोडला आहे आणि त्याचं पाणी तिथले जेवण बनवणारे कर्मचारी वापरताना दिसतायत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @brut.india इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “शौचालयाच्या नळाचे पाणी स्वयंपाकासाठी वापरले जाते का? जबलपूरमधील या व्हायरल व्हिडीओमुळे संताप व्यक्त झाला…” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
तर “हा व्हायरल व्हिडीओ पाहून जबलपूर आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. मध्य प्रदेशातील मेडिकल कॉलेजमध्ये टॉयलेटच्या नळातील पाणी जेवण बनवण्यासाठी वापरल्याचा संशय आहे. ६ फेब्रुवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजमध्ये हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कॉलेज प्रशासनाने सांगितले की, व्हिडीओ चुकीचा दाखवण्यात आला आहे आणि पाणी फक्त भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरले जात आहे, स्वयंपाकासाठी नाही,” असं या व्हिडीओमध्ये नमूद केलं आहे. पण, हे दावे किती खरे आणि खोटे आहेत हे अद्याप कळू शकलेलं नाही. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल एक मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ते डॉक्टरांच्या उपचारांसाठी रुग्ण तयार करत आहेत, त्यांना हे शिकण्याची गरज आहे.” तर दुसऱ्याने “आपल्या देशात आरोग्य आणि सुरक्षितता हा एक विनोद आहे” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “लोकांचा जीव घेणार का आता?”