Shocking video of wall collapsed: सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात अपघाताच्या, दुर्घटनांच्या व्हिडीओंचं प्रमाण जरा जास्तच असतं. पण, असे व्हिडीओ पाहून अनेकदा अंगावर काटा येतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयुष्यात कोणती घटना कधी घडेल ते काही सांगता येत नाही. वाईट वेळ कधीही कोणावरही येऊ शकते. अशा वेळी योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. न डगमगता, न घाबरता धीरानं निर्णय घेतला की, अनेकदा सकारात्मक गोष्टीच घडतात. सध्या अशीच एक घटना एका ठिकाणी घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये घेतलेल्या एका निर्णयामुळे कशा गोष्टी बदलू शकतात हे कळतं.

हेही वाचा… आजीचा जगात भारी लूक! नातीच्या लग्नासाठी केली खास तयारी, VIDEO एकदा पाहाच

वेळेवर योग्य निर्णय घेतला अन्…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा धक्कादायक व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये संरक्षक भिंतीच्या पुढे अनेक गाड्या पार्क केलेल्या दिसत आहेत; पण ही भिंत ढासळत आली असून, कधीही कोसळेल अशा अवस्थेत दिसतेय. परंतु, तरीही घाबरून न जाता एका माणसानं वेळीच योग्य निर्णय घेतला आणि आपली कार तिथून काढली. पण, त्याच वेळेस दुसरा माणूस तिथे फक्त उभा राहून बघत राहिला. त्यानं मात्र वेळीच योग्य निर्णय घेतला नाही आणि दुसऱ्याच क्षणी भिंत कोसळून, तेथील सगळ्या गाड्या भिंतीखाली दबल्या गेल्या.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @aprajeet_motivation या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर ‘योग्य निर्णय, योग्य वेळेवर घ्या म्हणजे होणारा त्रास कमी होईल’, अशी कमेंट केली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला ३० लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… याला म्हणतात नशीब! दोन मोठ्या बसमध्ये अडकला अन् चिरडला; पण पुढच्याच क्षणी चमत्कार झाला, पाहा थरारक VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “वेळेला योग्य निर्णय घेतला, तर गोष्टी आपल्या बाजूने करता येतात.” दुसऱ्याने “अगदी बरोबर”, अशी कमेंट केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of wall collapsed on car man decision saved damage viral video on social media dvr