Wife attacked on Husband Genitals Video: आजकाल कुठे ना कुठे गंभीर प्रकरण होतं असतात आणि ती कानावर पडत असतात. कोणाची हत्या तर कोणाची आत्महत्या तर ठरवून केलेला निर्घुण खून अशा सगळ्या घटना सध्या सगळीकडेच घडत आहेत. असे निर्दयी लोक दुसऱ्यांना त्रास देण्याआधी कसलाच विचार करत नाहीत.

सोशल मीडियावर अशा क्रूर घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात अनेकदा नवरा बायकोची भांडण, त्यांच्यात झालेले वाद दिसतात. तर काही लोक आपल्या जोडीदाराने त्रास दिला याची कबूली देत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या अशीच एक घटना फर्रुखाबादमध्ये घडली आहे ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक नवरा आपल्या बायकोने आपला कसा छळ केला याबद्दल सांगताना दिसतोय.

पत्नीने केला गुप्तांगावर वार अन्… (Wife attacks Husband Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक मुलाखतदार पीडित नवऱ्याला प्रश्न विचारताना दिसत आहे. तसंच पीडित त्यावर उत्तर देत आपली आपबीती सांगताना दिसतोय.

मुलाखतदार- काय नाव आहे तुझं

पीडित- संदिप

मुलाखतदार- काय घटना झाली आहे?

पीडित- २३ तारखेला रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी नशेली दवाई देऊन माझ्या गुप्तांगावर हल्ला केला. मी तक्रारदेखील केली होती. डिएसपी साहेब म्हणाले होते तुझी सुनावणी केली जाईल. वैद्यकीय तपासणी केली जाईल. पण अजूनही कोणतीच सुनावणी झाली नाही. पोलिस स्टेशनला जातो तर ते दोन दोन तास बसवून ठेवतात. कालपण गेलेलो मी. मा खूप त्रासात आहे.

मुलाखतदार- हे कोणी केलं होतं?

पीडित- माझ्या पत्नीने

मुलाखतदार- अच्छा का केलं?

पीडित- ती दुसऱ्या मुलांबरोबर बोलते आणि मला म्हणते मी तुझ्याबरोबर राहणार नाही. मी तिला विचारलं तुला नेमकं काय हवंय. तर ती म्हणाली तुझा जीव हवाय.

मुलाखतदार- या आधी कोणती घटना झाली होती का, ज्याची तू तक्रार केली आहेस.

पीडित- माझ्या डोक्यावर तिने एकदा चाकूने वारदेखील केला होता. पण तेव्हा मी कोणती तक्रार केली नव्हती.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @gharkekaleshया एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “फर्रुखाबाद, उत्तर प्रदेश: पत्नी रंजनाने पती संदीप झोपेत असताना त्याच्या गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार केले. अचानक त्याला जाग आली… पतीने पोलिस स्टेशन गाठले आणि पत्नी रंजनाविरुद्ध कारवाईची मागणी केली.” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

पीडित पतीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तो त्याच्या पत्नीपासून गुप्तांग वाचवू शकत नाही. बायकांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे” तर दुसऱ्याने “आजकाल हे सगळं काय सुरू आहे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “आजकाल बायका खूप क्रूर झाल्या आहेत, त्यांच्यापासून सावध राहा.”