सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. यात सिंह आणि वाघांचा क्रमांक पहिला येतो. ते जगातील सर्वात भयानक प्राण्यांपैकी एक मानले जातात, जे मानवांवर देखील हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना भूक लागली तर ते कोणालाही आपला बळी बनवू शकतात. झोपलेल्या वाघाच्याही जवळ जाताना प्राणी दहा वेळा विचार करतात, असाच एका वाघाचा आणि हरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.

वाघाच्या समोर कोणी आलं तर वाघ त्याला सोडणार नाही, हे तर आपल्याला माहित आहे. पण आळशी वागाने तसं केलं नाही, ज्यामुळे हरणाचे प्राण वाचले आहे.यानंतर वाघाचा चेहरा मात्र पाहण्यासारखा आहे. मांजराच्या हातून उंदीर सुटून मांजराची जशी अवस्था होते, तशीच अवस्था या खतरनाक वाघाची झाली आहे. वाघ उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहत राहिला पण हरणाला पकडण्यासाठी त्याला उठवलं नाही, तो हे सगळं पाहात राहिला पण काहीही करु शकला नाही आणि पुन्हा झोपला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video viral: आई मनाचा ‘बाप’माणूस! लेकीला पोटाशी घेऊन झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा संघर्ष

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक वारंवार हा व्हिडीओ पाहात आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. वाघ हा जंगलाचा राजा आहे. हा सुंदर प्राणी भारतातील विविध जंगलांमध्ये, अभयारण्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. यामुळे वाघांच्या संवर्धनाबाबत आपल्या देशातील लोक अधिक जागरुक असतात. जंगलांचे प्रमाण दिवसेनदिवस कमी होत असल्याने वनप्राण्यांची संख्या कमी होत आहे. हरीण, सांबर असे प्राणी वाघाची शिकार असतात. हे प्राणी नाहीसे झाल्याने भक्ष्य मिळवण्यासाठी वाघांसारखे जंगली प्राणी नाईलाजाने मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात.

Story img Loader