चमत्कारांवर तुमचा विश्वास नसला तरी जगात चमत्कार होतात यावर मात्र तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. दोन दिवसांपूर्वीचीच घटना घ्या ना! ज्या मुलाच्या अंत्ययात्रेची तयारी केली होती, तोच मुलगा अचानक जिवंत झाला, इमारती कोसळल्या, लोक ढिगा-याखाली गाढले गेले तरी एक चिमुकली मात्र जिवंत होती. असाच काहीसा चमत्कार पुन्हा एकदा पाहायला मिळाला. युट्युबवर ट्रेंडिग होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका महिलेच्या अंगावरुन ट्रेन गेली तरी ती जीवंत असल्याचे दिसत होते.
युट्युबच्या ट्रेंडिग लिस्टमध्ये या आठवड्यात दुस-या क्रमांकावर असलेल्या या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हिट्स मिळत आहेत. आतापर्यंत ५४ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. एका रेल्वे स्टेशनवरचा हा व्हिडिओ आहे. एका महिलेच्या अंगावरून ट्रेन जाते. ही महिला काही वाचणार नाही असच मनात धरून जो तो ट्रेन निघून जाण्याची वाट बघत असतं पण आश्चर्य म्हणजे ट्रेन निघून गेल्यानंतरही ती महिला रुळावरून सुखरूप बाहेर आली. तिला साधे ओरखडेही आले नव्हते. इतर प्रवाशांनी तिला नंतर रुळावरून खेचून बाहेर काढलं. कदाचित हा एका स्टंटचाही प्रकार असू शकतो. ही घटना कुठची हे मात्र समजू शकले नाही. ‘इन्क्रेडिबल इंडिया’ या युट्युब चॅनलवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओची सत्यता आम्ही पडताळली नाही पण सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.