Woman Stole Panties Video: सध्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. दिवसाढवळ्या चोर घरात घुसून चोरी करू लागले आहेत. तर कधी रेल्वेमध्ये पाकीटमार, दुकानात चोरी करणाऱ्या चोरांची दहशत वाढू लागली आहे. अगदी कसलीच पर्वा न करता, हे चोर हातचलाखीने चोरी करून दुसऱ्याचं नुकसान करून निघून जातात. अनेकदा यांच्यावर कारवाई होते; पण अनेकदा काही चोर हाताला लागत नाहीत आणि असं कृत्य पुन्हा पुन्हा करत राहतात.
अशात चोरीत अनेकदा महिलांचाही समावेश असतो. कोणाचंही लक्ष नसताना चोरट्या महिला बाजारातून, मॉलमधून किंवा अन्य गर्दीच्या ठिकाणाहून वस्तू चोरी करतात. अशात अनेकदा त्यांच्यावर कोणाचाही संशय येत नसल्याने त्या सुटतात. पण काहीवेळा अशा चोरट्या महिलांना रंगेहाथ पकडलं जातं. सध्या अशीच एक घटना एका ठिकाणी घडलीय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, या व्हिडीओमध्ये एका महिलेने कोणती वस्तू किंवा कपडे नाही तर चक्क पॅंटीची चोरी केली आहे.
महिलेने केली पॅंटीची चोरी (Woman Robbery Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, एका मॉलमध्ये महिलेने पॅंटीची चोरी केल्याचं दिसून येतंय. महिलेने चोरी केलीय हे कळताच त्या मॉलमधील महिला सुरक्षारक्षक तिची झडती घेण्यास सुरूवात करते. महिलेने एकावर एक अशा पाच पॅंटी घातल्या असतात. सुरक्षारक्षक तिची पॅंट खाली करून भर मॉलमध्ये एक एक पॅंटी मोजते.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला व्हिडीओ @jadaunmanojsingh_official या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला ४२ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. दरम्यान, हा प्रकार नेमका कुठे घडला हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “महिला असूनही असं कृत्य! कसे कसे लोक आहेत, २०० ३०० रुपयांसाठी हे सगळं का करतात?” तर दुसऱ्याने “योग्यच केलं” अशी कमेंट केली. तर “सोशल मीडियावर तिचा असा व्हिडीओ दाखवणे चांगले नाही. तिचे कृत्य निश्चितच वाईट आहे.” अशी एकाने कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करू नये… तो काढून टाकावा, आम्हाला समजते की तिने चूक केली आहे. पण तरीही सोशल मीडियावर अपलोड करणे हा तिच्यावर अन्याय्य आहे.”