Shocking Video of Young Man Sold Kidney: सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ पाहून अक्षरश: धक्काच बसतो. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी चक्क आपली किडनीच विकली. त्या तरुणाने नेमकं असं का केलं, जाणून घ्या…

मुलाने किडनीच विकली अन्… (Young man sold Kidney)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुण मुलगा त्याचं टीशर्ट वर करून आपलं पोट दाखवतोय. या तरुणाच्या पोटावर अनेक बॅंडेज लावलेल्या दिसत आहेत. त्या तरुणाचा व्हिडीओ एक माणूस रेकॉर्ड करताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करणारा हा माणूस म्हणतोय, “एक तरुण मेट्रोच्या इथे भेटला मला. या मुलाने एका मुलीसाठी आपली किडनी विकली. फक्त आयफोन १६ प्रो तिला घेऊन देण्यासाठी त्याने आपली किडनी विकली.”

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @kiddaan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “प्रेमात वेडा… प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी तरुणाने महागड्या आयफोन प्रो घेण्यासाठी किडनी विकली” अशी कॅप्शन देण्यात आली. व्हिडीओ व्हायरल होताच २ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “पोटावर बॅंडेज लावल्याने असं होत नाही की, किडनी काढली आहे” तर दुसऱ्याने “भावाने १ किडनी काढायला १ मिनिट पण लावला नाही आणि ती दुसऱ्याबरोबर जायला १ सेकंदही लावणार नाही” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “प्रेम अशी गोष्ट आहे की काहीही करायला लावते”