Shocking Video: वर्षानुवर्षं मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडिया, वृत्तपत्रं, बातम्या यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत.
अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या उघडपणे फिरतायत. त्यात काही मुली आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात, तर काही जणी घाबरून शांत बसतात. अशा काही विकृत लोकांवर कारवाईदेखील होते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात काही तरुण मुलं स्विमिंगपूलमध्ये एका तरुणीची छेड काढताना दिसतायत. नेमकं, काय घडलंय, जाणून घेऊ या…
संतापजनक व्हिडीओ व्हायरल (Abuse Video Viral)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, स्विमिंगपूलमध्ये एका तरु मुलीला काही तरुण मुलं त्रास देतायत. तरुणीच्या आजूबाजूला गोळा होऊन काही तरुण तिला पाण्यात बुडवून तिची चेष्टा मस्करी करून तिला त्रास देताना दिसतायत. यावर संतापून ती मुलगी बाजूला होते आणि त्यातील एका मुलाच्या कानाखालीच मारते. त्याला चांगलीच अद्दल घडवते. यामुळे बाकीचे तरुणही शांत होतात. यादरम्यान, ही धक्कादायक घटना नेमकी कुठे घडली हे कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @sararti_bacha10 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मुलींनो लक्षात ठेवा स्वत:ची सुरक्षा स्वत:च केली पाहिजे” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १ लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “या सगळ्या मुलांवर तक्रार दखल झाली पाहिजे” तर दुसऱ्याने “अशी मुलं पण संधीच बघत असतात, बरं झालं तिने चांगली अद्दल घडवली” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत लिहिलं, “या जागी तुमची बहिण असती तर असंच केलं असतं का”