Shocking Video: कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं. माणसावर वाईट वेळ आली किंवा वाईट परिस्थिती ओढवली, तर जमेल ते काम माणूस करतो. पोटाची भूक भागवण्यासाठी आणि दोन वेळचं जेवण मिळावं यासाठी लोक आवड नसतानाही ते काम करतात. आपल्या पोटापाण्यासाठी अनेकजण अशी काम करायला तयार होतात जिथे आदरच मिळत नाही. अशा कामांमध्ये ते अनेकदा लोकांची बोलणी ऐकून, अपमान सहन करूनही मूग गिळून गप्प बसतात आणि हे सगळं सहन करत असतात. पण नाईलाजास्तव त्यांना ते काम करावं लागतं.

पण, काही लोक या परिस्थितीचा गैरफायदा घेतात आणि अशा माणसांचा छळ करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये स्टेजवर परफॉर्म करणाऱ्या एका तरुणीबरोबर तरुणाने असं कृत्य केलं, जे पाहून सगळ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

तरुणीच्या डान्समध्ये तरुणाचा अश्लील प्रकार

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुमचाही राग अनावर होईल. या व्हिडीओमध्ये एक डान्स करणारी तरुणी स्टेजवर डान्स करताना दिसतेय. तेवढ्यात अचानक एक तरुण स्टेजवर चढतो. तरुणीसमोरच तो आपली पॅंट काढतो आणि तिच्यासमोरच मुद्दाम तिच्यासारखा डान्स करायला लागतो. हे सगळं घडत असताना तरुणी आपली खाली मान घालून दुसऱ्या बाजूला बघत आपला परफॉरमन्स सुरूच ठेवते. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @bro_kalyug या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “संस्कार दाखवतात की एखाद्याचे संगोपन कसे झाले आहे.” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तर व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.७ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “एखाद्याच्या मजबूरीचा फायदा कसं कोण घेऊ शकतं” तर दुसऱ्याने “कोणीतरी मदत करेल या आशेने ती मागे वळून पाहत आहे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “एक मुलगी आपल्या पोटापाण्याचा विचार करणारी आणि एक मुलगा आपली लायकी दाखवणारा”