Shocking Video: आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत असतात. कधी कॉमेडी, तर कधी डान्स व्हिडीओ, तसेच इन्फॉर्मेटिव्ह व बरेच क्राफ्ट व्हिडीओदेखील पाहायला मिळतात. हे व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकदा आपण लगेच स्क्रोल करतो; परंतु काही धक्कादायक व्हिडीओ कायम लक्षात राहतात.
आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा स्टंटबाजी करताना पाहिली असेल; पण ते स्टंट खूप काळजी घेऊन केले जातात. सिनेमाची गोष्ट सोडली, तर आता अनेक जण प्रत्यक्षात प्रसिद्धी, सोशल मीडियावरील काही व्ह्युज, लाइक्ससाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात आणि स्टंट करतात. हे स्टंट पाहून अनेकदा आपल्याच अंगावर काटा येतो. या स्टंटबाजीमध्ये अनेकदा त्यांचा जीवदेखील जातो. सध्या असाच जीवघेणा स्टंट एका तरुणीने केलाय आणि याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमकं काय केलंय या तरुणीने जाणून घेऊ या…
तरुणीचा स्टंट व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेला तरुणीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कपाळावर हात माराल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुणी अक्षरश: रेल्वे रुळावर झोपली आहे. हातात फोन घेऊन ती रेल्वे रुळामध्ये व्हिडीओ काढण्यासाठी हा स्टंट करताना दिसतेय. पटरीच्या मधोमध झोपून ती हा व्हिडीओ काढताना दिसतेय. तेवढ्यात एक भरधाव वेगात एक ट्रेन येते आणि या ट्रेनचा संपूर्ण व्हिडीओ ती रेकॉर्ड करते. दरम्यान, तरुणीने हा स्टंट नेमका कुठे केलाय हे अद्याप कळू शकले नाही.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @rupaligaikwad609 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला “हिच्या डेअरिंगला किती मार्क्स देणार” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला ७ लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “फोन ठेवून ती बाजूला गेली असणार.” तर दुसऱ्याने “निव्वळ मूर्खपणा आहे हा” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “थोड्या दिवसांनी तिला तुरुंगावास होईल आणि कलम लागेल.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of young woman recording video on railway track stunt video viral on social media dvr